मुंबई - पनवेल परिसरातील खारघरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. तरुणीला शितपेयातून मद्य पाजून दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला.
हेही वाचा -पंतप्रधान मोदींची राष्ट्रवादीच्या ट्विटर खात्यावरून खिल्ली उडवणारी व्हिडिओ पोस्ट
खारघर सेक्टर 12 मधील एका 19 वर्षीय तरुणीची एका बस चालकाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. संबधित बस चालकाने व त्याच्या मित्राने तरुणीला भेटायला बोलवले व शितपेयातून तिला मद्य पाजले. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला व तिला सेक्टर 18 मधील संजीवनी शाळेसमोरील रस्त्यावर फेकून दिले. बसचालक व त्याचा मित्र दोघेही संबधित ठिकाणाहून पळून गेले.