मुंबई- पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान जानेवारी २०२१ या एका महिन्यात अमली पदार्थ तस्करीचे तब्बल ३२७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ३५५ आरोपींना अटक केली असून ७८७ किलो वेगवेगळे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी २०२१ या एका महिन्यात तब्बल ७ कोटी ६ लाख ४८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीत कारवाई
- हेरॉईन-
अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी २०२१ या महिन्यात हेरोइन च्या संदर्भात २ गुन्हे दाखल केले असून या संदर्भात २ आरोपींना अटक करत ४ लाख २५ हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहेत.
- चरस-
चरस या अमली पदार्थांच्या तस्करीत यासंदर्भात ५ गुन्हे दाखल करत ८ आरोपींना अटक करण्यात आलेली असून तब्बल १० किलो चरस जप्त करण्यात आलेले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या चरस ची किंमत २ कोटी ८९ लाख ५६ हजार एवढी आहे .
- कोकेन / गांजा
कोकेन या अमली पदार्थ तस्करी त्यासंदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गांजाच्या तस्करीप्रकरणी ३८ गुन्हे अमली पदार्थविरोधी पथकाने दाखल करत ४८ जणांना अटक केली असून यासंदर्भात ७०७ किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त गांजाची किंमत १ कोटी २९ लाख १३ हजार एवढी असल्याचं समोर आलेला आहे.
- एमडी व इतर प्रकरण
मेफेड्रोन म्हणजेच एमडी या अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८ जणांना अटक करण्यात आलेली आहे. इतर प्रकरणात ६ गुन्हे दाखल करत १० आरोपींना अटक करण्यात आलेली आहे .
अमली पदार्थ सेवन संदर्भातील कारवाई-
अमली पदार्थ सेवन करणार्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत आपली पदार्थाचे सेवन करणाच्या संदर्भात २५९ गुन्हे दाखल झाले असून यासंदर्भात २६८ आरोपींना अमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.
केवळ १७ गुन्ह्यांचा तपास-
मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जानेवारी २०२१ या महिन्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली असून तब्बल २३५ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत केवळ १७ गुन्ह्यांचा छडा सायबर पोलिसांना लावता आलेला आहे. संगणकाच्या सोर्स कोडबाबत छेडछाडीचा १ गुन्हा दाखल करण्यात आलेला असून , फिशिंग- हॅकिंग व नायजेरियन फ्रॉड या संदर्भात २ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बनावट ई-मेल एसएमएस, एमएमएस या माध्यमातून फसवणूक करण्याचे २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ८ प्रकरणांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे. तर सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल तयार करणे , मोर्फिंग करणे सारखे ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये २ गुन्ह्यांचा छडा सायबर पोलिसांनी लावलेला आहे. क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या संदर्भात मुंबई शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ४९ गुन्हे दाखल करत केवळ २ प्रकरणाचा छडा आतापर्यंत सायबर पोलिसांना लावण्यात यश आले आहे. तर इतर प्रकरणांमध्ये १५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये केवळ ४ प्रकरणाचा छडा सायबर पोलिसांनी लावलेला आहे.