मुंबई -मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा समोर आणला. आता या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. तपासादरम्यान मुंबई, इंदुर, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी छापे टाकून ईडीने निवासी, व्यावसायिक व इतर प्रकरणातील 32 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ही संपत्ती फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामूवी या वाहिन्यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तब्बल 46 कोटी रुपयांच्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात या वाहिन्यांच्या विरोधात ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने केलेल्या तपासात, बॅरोमीटरच्या माध्यमातून टीआरपीमध्ये फेरफार करून फक्त मराठी, महा मुवी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा टीआरपी हा वाढवण्यात आला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी 1 हजार 800 बेरो मीटरचा वापर करण्यात आलेला आहे. तर, देशभरात जवळपास ४४ हजार बॅरोमीटर वापरण्यात येत आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या दोन वाहिन्यांसाठी काही घरात टीआरपी फेरफार करणारे बॅरोमीटर लावण्यात आले होते. ज्यामुळे या दोन वाहिन्यांचा टीआरपी पंचवीस टक्क्याहून अधिक दाखवण्यात आलेला होता.
मुंबई पोलिसांकडून तपास सुरू