मुंबई- श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन धार्मिक व इतर कामकाज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 अन्वये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीतर्फे करण्यात येते. या अधिनियमातील समितीच्या लेखा परीक्षणाच्या अहवालाचा सारांश राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पंढरपूर मंदिर अधिनियमात होणार सुधारणा; लेखा परिक्षणाचा अहवाल राजपत्रात प्रसिध्द केला जाणार - श्री साईबाबा संस्थान विश्वस्त संस्था
पंढरपूर मंदिरे अधिनिमय-1973 मधील कलम 49 (2) च्या तरतुदीनुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या रकमा व लेखा परीक्षण अहवाल आणि त्यावर धर्मादाय आयुक्तांनी दिलेले निर्देश यांसह अहवालाचा मतितार्थ राजपत्रात प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. त्यानंतर शक्य तितक्या लवकर तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांपुढे ठेवण्यात येईल, अशीही तरतूद आहे.

शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त संस्थेच्या नियमावलीत ही तरतूद नाही. त्यामुळे सर्व संस्थानांच्या नियमावलीत समरूपता आणण्याच्या दृष्टीने सारांश राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. ही तरतूद वगळण्यास आणि त्यानुसार सुधारणा करण्यास आज मान्यता देण्यात आली.