महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीचे सुधारीत वेळापत्रक; राखीव जागांवर मिळणार प्रवेश - एसईबीसी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी अकरावीचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. खुल्या वर्गातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आरक्षित जागासाठी अर्ज करता येणार आहेत.

मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीचे सुधारीत वेळापत्रक

By

Published : Jun 29, 2019, 2:10 AM IST

Updated : Jun 29, 2019, 2:19 AM IST

मुंबई- राज्यात न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविले. यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी अकरावीचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. खुल्या वर्गातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आरक्षित जागासाठी अर्ज करता येणार आहेत.

खुल्या प्रवर्गातून ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुन्हा एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग) आणि ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे त्यासाठी अकरावीच्या जागा भरल्या जाणार आहेत.

एसईबीसी प्रवर्गात ३४ हजार २५१ राखीव जागांपैकी ४ हजार ५५७ तर ईडब्लूएस प्रवर्गात २८ हजार ६३६ जागांपैकी २ हजार ६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळए त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग - १ आणि भाग - २ नोंदणीसाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसईबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पनाचे प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र स्वीकारले जाणार आहे. मात्र, याबाबत हमीपत्र विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी दाखल करणे गरजेचे आहे. यानंतर १२ जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. शासन निर्णयात अकरावी प्रवेशासाठी एसईबीसी प्रवगार्साठी १६ टक्के आणि ईडब्लूएस प्रवगार्साठी १० टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, गुरुवारी (२७ जून) उच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण वैध ठरवत त्यांना शिक्षणात १२ टक्के आरक्षण मंजूर केले. त्यामुळे आता प्रवेशाचे संपूर्ण गणित बदलले. त्यामुळे शिक्षण विभागाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची नोंदणी आणि आरक्षित जागा निवडण्याची संधी देण्यात आली आहे. मेरीट जाहीर झाल्यानंतर दोन दिवसात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचे आहे.

ऑनलाईन नोंदणीच्या तारखांचे वेळापत्रक

  • अर्ज भरणे ४ जुलैपर्यंत
  • साधारण यादी ५ जुलै
  • माहिती दुरुस्ती ६ ते ८ जुलै
  • पहिली मेरीट लिस्ट १२ जुलै
  • प्रवेश निश्चिती १३ ते १६ जुलै
  • अर्जात बदल १७ ते १८ जुलै
  • दुसरी मेरीट लिस्ट २२ जुलै
  • तिसरी मेरीट लिस्ट १ ऑगस्ट
  • विशेष मेरीट लिस्ट ९ ऑगस्ट
Last Updated : Jun 29, 2019, 2:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details