मुंबई-ठाण्यात होणारा रिक्षाचालकांचा संप तूर्तास मागे
मुंबई - विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
CRICKET WC १st Semifinal : कॅप्टन हॉट विरुद्ध कॅप्टन कूल, आज भारत-न्यूझीलंड आमनेसामने
मँचेस्टर - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार असून स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. सविस्तर वाचा...
परिस्थितीसमोर हतबल शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपले औताला
हिंगोली - दिवसेंदिवस शेतकरी परिस्थिती समोर हतबल होत चालला आहे. त्यातच पाऊसही नाही अन वाढत्या महागाईने तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलंय, अशा परिस्थितीत शेती करणे म्हणजे शेतकऱ्यांसमोर एक आव्हानच आहे. सर्वसामान्य शेतकरी तर यामध्ये चांगलाच भरडून चाललाय. व्यवसायाने कुंभार असलेल्या अशाच एका अल्पभूधारक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल होऊन स्वतःचे आख्खे कुटुंबच औताला जुंपलेय. हे विदारक चित्र आहे वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका शेतकरी कुटुंबाचे. सविस्तर वाचा...
ज्योतिषापेक्षा चंद्रकांत पाटलांना अचूक भविष्य समजते, राजू शेट्टींचा टोला
सांगली- ज्योतिषाला भविष्य समजत नाही मात्र, महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांना अचूक भविष्य समजते, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी टोला लगावाला आहे. चंद्रकांत पाटील यांचा निवडणूकीतील विजय आणि आकडेवारीच्या विधानाबाबत निशाणा साधत शेट्टी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ते सांगलीमध्ये बोलत होते. सविस्तर वाचा...
विक्रोळीत धोकादायक इमारती; हजारो रहिवाशांचे जीव धोक्यात
मुंबई - शहरातील जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यात आणखीनच गंभीर झाला आहे. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये म्हाडा वसाहतीतील जुनाट इमारती कधीही कोसळतील, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वाचा...
बातमी, सर्वांच्या आधी... पाहा ईटीव्ही भारत
www.etvbharat.com/marathi/maharashtra