महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता  रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - rain news

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश, सिनेसृष्टीतील अभिनेत्रीचाही समावेश. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू, विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन. MUMBAI RAIN UPDATE :मुंबईत पावसाचे ३ बळी तर ५ जण जखमी, येत्या ४८ तासांत धुवाँधार. माऊलींच्या पालखीने 'दिवेघाट' केला पार, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. ये भगवा रंग...भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बीसीसीआयकडून अनावरण.

महत्वाच्या बातम्या

By

Published : Jun 28, 2019, 11:44 PM IST

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश, सिनेसृष्टीतील अभिनेत्रीचाही समावेश


रायगड - एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलीसांनी अटक केली आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्‍याची माहिती मिळाली आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.वाचा सविस्तर...

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू, विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन


मुंबई - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ही हे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आरक्षणासाठी अर्ज दाखल करावेत असे आवाहन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केले आहे. वाचा सविस्तर...

MUMBAI RAIN UPDATE :मुंबईत पावसाचे ३ बळी तर ५ जण जखमी, येत्या ४८ तासांत धुवाँधार


मुंबई - गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे. वाचा सविस्तर...

माऊलींच्या पालखीने 'दिवेघाट' केला पार, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील सर्वात अवघड असणाऱ्या दिवेघाटाचा रस्ता लाखो वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पार केला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरूणराजानेही आवर्जून हजेरी लावली होती. वाचा सविस्तर...

ये भगवा रंग...भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बीसीसीआयकडून अनावरण

नवी दिल्ली- सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून ट्विटरद्वारे करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...


बातमी, सर्वांच्या आधी
www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details