महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : अरबी भाषेच्या शिक्षकाला दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक - Maharashtra breaking news

Breaking News
ब्रेकिंग न्यूज

By

Published : Feb 4, 2023, 10:39 AM IST

Updated : Feb 4, 2023, 9:55 PM IST

21:53 February 04

अरबी भाषेच्या शिक्षकाला दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक

मुंबई - एका २५ वर्षीय अरबी भाषेच्या शिक्षकाला दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीएस ओशिवरा येथे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

20:30 February 04

सायनमधील सोमय्या हॉस्पिटलच्या बांधकामाधीन इमारतीला आग

मुंबई - सायनमधील सोमय्या हॉस्पिटलच्या बांधकामाधीन इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

19:44 February 04

सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता - रिजिजू

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता मिळाली आहे. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटद्वारे याची घोषणा केली आहे. सध्या, भारताच्या सरन्यायाधीशांसह (CJI) 27 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात काम करत आहेत. तर CJI सह त्याची मंजूर संख्या 34 आहे.

19:35 February 04

राज ठाकरेंविरोधात पुन्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

सांगली - मनसे नेते राजे ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावला आहे.मनसेचे शिरीष पारकर यांना देखील बजावण्यात आला आहे,व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तारखेला हजर राहिले नसल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना पुन्हा वॉरंट बजावले आहे.

18:17 February 04

शंभुराजेंनी अगोदर शिवसैनिकाशी लढावे - शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम

सातारा - शंभुराजेंनी अगोदर शिवसैनिकाशी लढावे, मग आदित्य ठाकरेंना आव्हान द्यावे असे प्रत्युत्तर शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी दिले आहे. शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना पाटणमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान आजच दिले आहे.

18:13 February 04

राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारांची घोषणा

मुंबई - राज्य सरकारने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारांची घोषणा केली आहे. गेल्या तीन वर्षातील पुरस्कार सरकारने एकदम जाहीर केले आहेत. यामध्ये प्रवचनकार बाबा महाराज सातारकर (2020-21), श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र गोविंददेव गिरी महाराज (2021-22), महंत बाभूळगावकर शास्त्री (2022-23) यांना सरकारने जाहीर 'ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार जाहीर केले.

17:55 February 04

पाटणमधून निवडणूक लढवून दाखवा; शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

सातारा - आदित्य ठाकरे वरळीतून निवडून येण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. तेच त्या आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. मुख्यमंत्र्यांचे राहू द्या, तुम्ही पाटण विधानसभा मतदार संघात येऊन निवडून येऊन दाखवा, असे आव्हान उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्र्यांना वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना शंभूराजेंनी प्रतिआव्हान दिले.

17:54 February 04

RSS बदनामी प्रकरण : राहुल गांधींच्या याचिकेवर न्यायालय 4 मार्च रोजी निर्णय देणार

ठाणे - राहुल गांधी यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या कथित मानहानीच्या खटल्याची सुनावणी भिवंडी येथील न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी राहुल गांधी यांच्या याचिकेवर ४ मार्च रोजी न्यायालय निर्णय देणार आहे. .

16:49 February 04

मुंबई बजेटवरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, देशाच्या बजेटमध्ये गुजरात, कर्नाटकला खैरात दिल्याची टीका

मुंबई - वर्षा बंगल्यावर छापून आलेले कॉन्ट्रॅकर आणि मित्रांचे बजेट असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईच्या बजेटमध्ये कोणताही मोठा प्रकल्प नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या बजेटमध्ये कर्नाटक, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधीची खैरात केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

16:43 February 04

सत्यजीत तांबे यांची स्पष्टोक्ती, अपक्ष म्हणूनच कार्य करत राहणार

अपक्ष नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणूनच कार्य करत राहणार असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

16:30 February 04

तामिळनाडूमध्ये साडी धोतर वाटप कार्यक्रमात गोंधळ, 4 महिलांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये साडी धोतर वाटप कार्यक्रमात गोंधळ झाला. यावेळी 4 महिलांचा मृत्यू झाला.

15:42 February 04

ट्विटरवरुन मुंबईवर अतिरेकी हल्ल्याची धमकी

मुंबई - शहरावर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्याने यावेळी ट्विटर हॅण्डलचा वापर केला आहे.

15:36 February 04

नायजेरियन नागरिक लावत होते शालेय मुलांना नशेचे वेड, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

मुंबई - अँटी-नार्कोटिक सेल आणि पोलिसांनी नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून 13 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. आरोपींनी मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन लावले आणि ते जवळच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुरवायचे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

15:18 February 04

लहान मुलांना ड्रगचे व्यसन लावणाऱ्या नायजेरियन नागरिकाला मुंबईतून अटक

मुंबई - अँटी-नार्कोटिक सेल आणि पोलिसांनी 3 फेब्रुवारी रोजी नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 13 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आरोपींनी मुलांना अंमली पदार्थांचे व्यसन लावले आणि ते जवळच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुरवायचे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

14:37 February 04

गायिका वाणी जयराम यांचे निधन

चेन्नई - अयार लांटुम भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम (78) यांचे निधन झाले. काल रात्री घराला कुलूप लावून आतून झोपल्या होत्या. मात्र आज सकाळी अकरा वाजता घरातील कर्मचारी घराची साफसफाई करण्यासाठी आले असता बराच वेळ दरवाजा न उघडला नाही. त्यामुळे बहिण उमाला माहिती दिली. दुसऱ्या चावीने दार उघडले असता कपाळावर जखमा असलेल्या अवस्थेत त्या पडल्या होत्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी किलपक्कम सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.

14:33 February 04

अदानींसंदर्भात नियामक आणि तपास संस्था निर्णय घेतील - निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - अदानींच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, तपास संस्था तसेच नियामक यासंदर्भात काम करत आहेत. नियामक सरकारपासून स्वतंत्र आहेत, जे योग्य आहे ते करणे त्यांचे काम आहे. जेणेकरून बाजार चांगला नियंत्रित होईल, असे अदानींबद्दलच्या प्रश्नावर सीतारामन म्हणाल्या.

13:47 February 04

फायर ब्रिगेडच्या भरती दरम्यान दहिसर परिसरात उमेदवारांवर लाठीचार्ज

मुंबई - फायर ब्रिगेडच्या भरती दरम्यान दहिसर परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

13:41 February 04

Breaking News : महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा! कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धगेकर तर पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे

पुणे :महाविकास आघाडीकडून पुणे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धगेकरांना यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल कलाटेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.

12:53 February 04

पुणे महापालिका अधिकाऱ्याची सोशल मीडियावर बदनामी, गुन्हा दाखल

पुणे :पुणे महानगरपालिकेत शहर अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक खोटा आणि चुकीचा मजकूर टाकून बदनाम केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12:38 February 04

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची ईडीकडून सलग ३ दिवस चौकशी

नवी दिल्ली - टीएमसीच्या साकेत गोखले यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अलंकार सवाई यांची सलग ३ दिवस चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ईडीने सवाई यांच्याकडे गोखले यांना दिलेल्या २३.५४ लाख रुपयांची विचारणा केली आहे.

12:08 February 04

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर कसबा पेठमध्ये हेमंत रासने यांना भाजपची उमेदवारी

चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी तर कसबा पेठमध्ये हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे

11:28 February 04

कुत्र्याला गुंगीचे औषध देऊन 17 लाखांची लूट, आंतरराज्य टोळी गजाआड

नाशिक -दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे एका बंगल्यात 12 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी लूट केली होती. संशयितांनी सुरुवातीला बंगल्यातील कुत्र्याला गुंगीचे औषध पाजून घरात प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि 8 लाख 50 हजार रुपयांसह रोख रक्कम असा एकूण 17 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. लूट करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. लुटीतील 4 लाख 60 हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. यात चार संशयितांना अटक करण्यात आली आहे, इतर दोन फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

11:07 February 04

Breaking News : मुखेड-लातूर महामार्गावर एसटी बस अन् कंटेनरचा अपघात, ९ प्रवाशी जखमी

नांदेड : मुखेड लातूर राज्य रस्त्यावरील मुखेड नजीक असलेल्या दबडे शिरूर पाटी जवळ बस व कंटेनर ची समोरासमोर धडक झाल्याने एसटी चालक, वाहक यांच्या सह बस मधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकुण सहा प्रवासी जखमी

08:50 February 04

Breaking News : बेल्हा-जेजरी मार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई :पुणे : बेल्हा -जेजरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास भीषण अपघातात मायलेकांचा आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Last Updated : Feb 4, 2023, 9:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details