महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News Live : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन - Maharashtra Breaking News

ब्रेकींग न्यूज
Breaking News

By

Published : Jan 28, 2023, 8:36 AM IST

Updated : Jan 28, 2023, 9:51 PM IST

21:50 January 28

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे.

21:31 January 28

काँग्रेस बोगस पक्ष, काँग्रेस उमेदवाराच्या संभाषणाचा ऑडिओ व्‍हायरल

अमरावती - पदवीधर मतदार संघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर होत असताना काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्यात मोबाईल फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे काँग्रेस हा बोगस पक्ष आहे अशी टीका करताना स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे ही ऑडिओ क्लिप अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

21:06 January 28

भाजपच्या आंदोलनानंतर देखील TISS मध्ये लॅपटॉपवर दाखवली जातेय BBC ची डॉक्युमेंटरी

मुंबई -: सध्या देशभर चर्चेचा विषय बनलेली BBC ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित India : The Modi Question ही डॉक्युमेंटरी सध्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजेच TISS मध्ये लॅपटॉपवर विद्यार्थ्यांना दाखवली जात आहे. देशभर या डॉक्युमेंटरी वरून वाद सुरू असतानाच मुंबईत भाजप नेत्यांकडून या डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनावरून आव्हान दिले जात होते. सोबतच भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी टिस बाहेर आंदोलन देखील केलं. मात्र, या आंदोलनानंतर देखील मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर ही डॉक्युमेंटरी दाखवली जात आहे.

20:22 January 28

माझगाव येथील बीपीटी कॉलनी परिसरातून दोन ड्रग्स स्मग्लर्सना अटक

मुंबई : माझगाव येथील बीपीटी कॉलनी परिसरातून अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोन इसमांकडून दहा लाख 60 हजार किमतीचा एमडी ड्रग्स 24 हजार किमतीचा गांजा जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 क, 20 ब, 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19:00 January 28

माझगाव येथील बीपीटी कॉलनी परिसरातून अमली पदार्थ जप्त

मुंबई - माझगाव येथील बीपीटी कॉलनी परिसरातून अमली पदार्थ विरोधी कक्ष आझाद मैदान युनिटने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोन इसमांकडून दहा लाख 60 हजार किमतीचा एमडी ड्रग्स तसेच 24000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

18:56 January 28

सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासामुळे नवी मुंबईतील बलात्कारी आरोपींना २४ तासात अटक

नवी मुंबई - अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ईश्वरनगर, दिघा ठाणे येथून आरोपीने युवतीला उचलून घेऊन साथीदारासह तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासामुळे दोन्ही आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली आहे. : दीपक शेळके रावळे, गुन्हे शाखेचे पथक

18:51 January 28

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये मेळावा

नांदेड -महाराष्ट्र- कर्नाटक आणि महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद सुरू असतानाच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी आपल्या पक्षाची एन्ट्री महाराष्ट्रात नांदेडमधून करत असल्याची भूमिका यापूर्वीच बोलून दाखविली होती. त्यानुसार तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संवाद मेळावा होणार आहे. दरम्यान, शनिवारी म्हणजेच आज गुरूव्दारा मैदानावर मेळाव्याच्या स्थळाचे पूजन करण्यात आले.

18:19 January 28

सरकारवर अवलंबून राहू नये, अन्यथा चालती गाडी पंक्चर होते - नितीन गडकरी

सांगली -"सेक्सेल सिमेन"या प्रयोगशाळेमधील जेनेटिक सायन्समुळे दुग्ध क्षेत्रात क्रांती होईल, असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारवर अवलंबून राहू नये, अन्यथा चालती गाडी पंक्चर होते, असेही ते यावेळी म्हणाले.

17:23 January 28

मुंबई विमानतळाबाहेर गोंधळ घालणाऱ्या एका महिलेला अटक

मुंबई - पोलिसांनी काल विमानतळाबाहेर गोंधळ घालणाऱ्या एका महिलेला अटक केली. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे डीसीपी (झोन ८) दीक्षित गेडाम यांनी सांगितले आहे. या महिलेने 26 जानेवारीला विमानतळाबाहेर गोंधळ घातला होता.

16:48 January 28

फाटक्या नोटा विकत घेणाऱ्याचे अश्लिल चाळे, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

जालना : शहरात तसेच जिल्ह्यात फाटक्या नोटा विकत घेणाऱ्या एका 45 वर्षाच्या व्यक्तीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शिक्षकाच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड रोडवरील एका भागात लहान मुली अंगणात खेळत असताना फाटक्या नोटा विकत घेणाऱ्या 45 वर्षाच्या व्यक्तीने लहान मुलींना जवळ बोलावले. तसेच त्याच्या पॅन्टची चेन उघडून गुप्तांग दाखवत लहान मुलींच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. याबाबत एका शिक्षकाने तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरुन हा गुन्हा दाखल केला आहे.

16:37 January 28

राष्ट्रपती भवनाच्या उद्यानांचे नाव बदलले आता मुघल गार्डन्स नाही तर 'अमृत उद्यान'

नवी दिल्ली - आझादी का अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानांना 'अमृत उद्यान' असे नाव दिले आहे. राष्ट्रपतंच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी ही माहिती दिली.

16:03 January 28

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण खटला जलदगतीने सुरू करा; आरोपीचे कारागृहात आमरण उपोषण

मुंबई - 13 जुलै 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नकी अहमद शेख याने या प्रकरणात 11 वर्ष गेले असताना देखील खटला सुरू झाला नसल्याने लवकरात लवकर सुरू करून या खटल्याची सुनावणी दैनंदिन घेण्यात यावी याकरिता अनिश्चित काळासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणात एटीएसने 2012 मध्ये आरोपीला अटक केली होती. या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात 27 लोकांचा मृत्यू तर 130 हून अधिक जखमी झाले होते.

15:28 January 28

'टीसने पंतप्रधानांच्या बदनामीचा प्रयत्न करू नये'

मुंबई - बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीद्वारे असत्य आणि अपप्रचार केला जात आहे. तीस सारख्या संस्थेने अथवा तेथील विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने पंतप्रधानांचा अपप्रचार करू नये, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने वागावे लागेल, असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष शेलार यांनी दिला आहे.

14:25 January 28

वेस्टर्न लाईनजवळ हायड्रा क्रेनच्या बूमची लोकलला धडक, काच फुटली

मुंबई - नायगावच्या वेस्टर्न लाईनजवळ काम करणाऱ्या हायड्रा क्रेनच्या बूमने EMU मोटर केबिनला धडक दिली. त्यामुळे समोरची काच फुटली. तसेच मोटरमन जखमी झाला आहे. किरकोळ दुखापत झालेल्या मोटरमनवर प्राथमोपचार करण्यात आले.

14:18 January 28

वकील जीन्स घालून आल्याने हायकोर्टाने पोलिसांना बोलावून त्यांना काढले बाहेर

गुवाहाटी - आसामच्या हायकोर्टाने आज एका प्रकरणाला स्थगिती दिली कारण याचिकाकर्त्याचे वकील न्यायालयाच्या आवारात जीन्स घालून आले होते. याबाबत आदेश देताना हायकोर्टाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्याचे वकील बी.के. महाजन यांनी जीन्स घातली होती. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोर्टाला पोलिस कर्मचार्‍यांना हायकोर्टात पाचारण करावे लागले. हायकोर्टानेच असे आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

12:49 January 28

ठाकुर्ली खाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाणे - डोंबिवलीच्या ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस असल्याचे सांगत नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणी आपल्या मित्रासोबत ठाकुर्ली जवळील बावन चाळ परिसरात खाडी किनारी फिरायला गेली असताना हा प्रकार घडला. विष्णू नगर पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12:05 January 28

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली फायटर प्लेन अपघातांची माहिती

नवी दिल्ली -सुखोई-३० आणि मिराज २००० विमान मोरेना, मध्य प्रदेशजवळ कोसळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अपघाताची माहिती घेतली. तसेच सीडीएस जनरल अनिल चौहान आणि आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हेही घटनास्थळाशी संपर्कात आहेत. अपघाताची अधिक माहिती घेण्यात येत आहे.

11:29 January 28

मुरैनामध्ये हवाई दलाचे फायटर जेट मिराज विमान कोसळले

मुरैना - मध्यप्रदेशातील मुरैनामध्ये हवाई दलाचे फायटर जेट मिराज विमान कोसळले आहे. या विमानातील वैमानिक शहीद झाला आहे.

10:43 January 28

Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर, बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यातील सलग हा दुसरा मुंबई दौरा आहे.

09:25 January 28

Breaking News : हॉस्पिटलला भीषण आग, डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू

धनबाद (झारखंड) : येथील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील टेलिफोन एक्सचेंज रोडवर हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. हाजरा क्लिनिकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत डॉक्टर दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

08:30 January 28

Breaking News : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात दुःखद निधन

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात दुःखद निधन

Conclusion:

Last Updated : Jan 28, 2023, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details