मुंबई - मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 15 जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना क्यूआर पास दिला जाणार आहे. या क्यूआर कोड पासची 10 ऑगस्टपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
क्यूआर कोड पासची 10 ऑगस्टपासून अंमलबजावणी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड पास मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत हा क्यूआर कोड पास मिळण्याची शक्यता आहे.
local train
पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून क्यूआर कोडचा दस्तऐवज राज्यसरकारकडे दिला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड पास मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत हा क्यूआर कोड पास मिळण्याची शक्यता आहे.
क्यूआर कोड पास मिळाल्यास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची पटकन ओळख पटण्यास आणि गर्दीचे नियोजन करण्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मदत होणार आहे.