मुंबई -कोविड 19चा प्रादुर्भाव आणि जग प्रभावित असताना देशात आणि राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. महाराष्ट्रामध्ये 33 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पार केल्यानंतर राज्य सरकारने स्वतः हून लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घोषित केला होता. त्यानुसार आज अध्यादेश जारी करून 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारने केली आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरू आहे. पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाऊनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
राज्यात लॉकडाऊन 4.0 ची अंमलबजावणी होणार रेड झोन कडक; ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये शिथिलता २२ मे पासून नवीन आदेश लागू होणार असून ते ३१ मे पर्यंत कायम राहतील. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अटी शर्ती सहित बस,टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.रेड झोन मधील कडक नियमावली कायम ठेवण्यात आली असून सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचे संकेत राज्य सरकारने दिले आहे.
चार्ट : काय सुरू राहणार आणि काय राहणार चौथ्या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना -
1. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच राहणार( वैद्यकीय आणि संरक्षण सेवांना सूट)
2. सर्व प्रकारच्या मेट्रो सेवा बंद राहणार
3. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण आणि कोचिंग संस्था बंद राहणार; ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी कायम
4. हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा बंद राहणार( अत्यावश्यक सेवा आणि होम डिलिव्हरी साठी परवानगी)
5. सिनेमागृह,शॉपिंग मॉल,व्यायाम शाळा स्विमिंग पूल मनोरंजन पार्क थिएटर बार आणि सार्वजनिक प्रेक्षागृह बंद राहणार
6. सामाजिक-राजकीय, क्रीडा मनोरंनात्मक,शैक्षणिक सांस्कृतिक सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी कायम
7.सर्व धार्मिक ठिकाण प्रार्थनास्थळ आणि धार्मिक मेळावे बंद राहणार
हे बंद राहणार -
– ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सर्वच झोनमध्ये बंद राहणार.
– आंतरराज्य रस्ते वाहतूक बंदच राहणार.
– शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, हॉटेल, मॉल, प्रार्थनास्थळे, बंदच राहणार.
– दारु दुकाने – रेड झोनमध्ये होम डिलिव्हरीला परवानगी, कंटेनमेंट झोनमध्ये बंद राहणार, अन्य झोनमध्ये सुरू राहणार.