मुंबई -वांद्रे येथे जलवाहिनी फुटल्याने वांद्रे पूर्व, धारावी, सांताक्रूझ आदी ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यापूर्वी वांद्रे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी वांद्रे ते धारावी या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वांद्रे ते धारावीकरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
जलवाहिनी फुटल्याने वांद्रे, धारावीकरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
वांद्रे स्टेशन येथे महापालिकेची जलवाहिनी सोमवारी रात्री अचानक फुटली. त्यामुळे धारावी, वांद्रे पश्चिम, कलिना (सांताक्रूझ) आदी ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
वांद्रे,धारावीकरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम
वांद्रे स्टेशन येथे महापालिकेची 48 इंच व्यासाची जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी सोमवारी रात्री फुटल्याने धारावी, वांद्रे पश्चिम, कलिना (सांताक्रूझ) आदी ठिकाणच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून दुरुस्तीचे काम करत आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.