महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 1, 2020, 9:15 AM IST

ETV Bharat / state

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी

राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा..

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी

मुंबई - राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा.

गोंदियात ओमान मधून आलेल्या ८ व्यक्तींसह १४ कोरोनाबाधितांची भर
गोंदिया - कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने वाढतच चालला आहे. शुक्रवारी पुन्हा नव्या १४ रुग्णांची भर पडली. त्यात तिरोडा तालुक्यात ८ रुग्ण हे परदेशातील ओमान शहरातून आलेले आहेत. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले, यामध्ये दोन रुग्ण ओरिसा येथून तर एक रुग्ण हैद्राबाद येथून आलेला आहे. गोंदिया शहरातील कुडवा येथील एक रुग्ण आहे. एक रुग्ण हा सालेकसा येथील असून तो रायगड येथून आलेला आहे. या बाधित रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २९३ झाली आहे. तर ५५ रुग्ण हे क्रियाशील आहेत.

चिंता वाढली..जळगावात 245 नवे कोरोनाबाधित, तर 12 मृत्यू

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. शुक्रवारी देखील 245 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण 11 हजार 103 इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या सातत्याने वाढतच आहे. शुक्रवारी दिवसभरात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्याही 518 वर पोहचली आहे.

शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये सर्वाधिक 57 पॉझिटिव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 17, भुसावळ-13, अमळनेर 28, चोपडा 26, पाचोरा 4, भडगाव 12, धरणगाव 3, यावल 2, एरंडोल 1, जामनेर 30, रावेर 2, पारोळा 5, चाळीसगाव 29, मुक्ताईनगर 10, बोदवड 5 तसेच अन्य जिल्हा 1 असे एकूण 245 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 3028 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 7 हजार 557 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी देखील 270 जण कोरोनावर मात करून घरी गेले.

रत्नागिरी जिल्ह्यात 28 कोरोना बाधितांची भर, कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाण वाढले

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी 24 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1193 झाली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1774 झाली आहे. तर सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 522 आहेत. तर आजपर्यंत एकूण 59 जणांचा मृत्यू झाला आहे.

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन

जिल्ह्यात सध्या 227 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 28 गावांमध्ये, दापोली मध्ये 12 गावांमध्ये, खेड मध्ये 65 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 102 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2 , गुहागर तालुक्यात 10 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

नांदेड जिल्ह्यात 154 बाधितांची भर, तिघांचा मृत्यू

नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी 31 जुलैच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 41 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर तब्बल 154 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 839 एवढी झाली असून यातील 887 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 859 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत व्यक्तींची संख्या 81 एवढी झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 913 बाधित रुग्णांची नोंद;12 जणांचा मृत्यू

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल 913 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ही रुग्ण संख्या महानगर पालिका हद्द आणि ग्रामीण परिसरातील आहे. तसेच गेल्या 24 तासात 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात खेड, चाकण या परिसरासह शहरातील काही भागांचा समावेश आहे.

या आकडेवारीबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 21 हजार 193 वर पोहोचली आहे. पैकी, 12 हजार 575 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले असून शुक्रवारी 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 527 एवढी आहे.

उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरूच, शुक्रवारी 258 रुग्णांची भर,8 जणांचा मृत्यू

नागपूर - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शुक्रवारी आणखी 258 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 130 जणांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.

नागपुरातील एकूण कोरोनाबाधितत रुग्णांची संख्या ५३९२ इतकी झाली आहे. यामध्ये १०७ रुग्ण हे नागपूर जिल्ह्या बाहेरील आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या २५८ रुग्णांपैकी १३२ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत, तर १२६ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत.

नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४७७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत नागपुरात एकूण १२६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात 73 कोरोनाबाधितांची भर

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवार ते शुक्रवार या चोवीस तासांत ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार २४४ इतकी झाली असून, ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ४८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७०६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्डब्रेक, 6 जणांचा मृत्यू

सांगली- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाण होत आहे. शुक्रवारीही 339 इतकी कोरोनाबाधित रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली. यात पालिका क्षेत्रातील २७४ जणांचा समावेश आहे. तर ९५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच शुक्रवारी उपचार घेणाऱ्या ६ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या १,४३७ झाली आहे. एकूण आकडा २,६४३ झाला आहे.
आज पर्यंत १,१२८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर ७८ जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

धक्कादायक ! जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार पार

सातारा - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला असून नुकत्याच हाती आलवल्या अहवालानुसार जिल्ह्यात 203 जण बाधित निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 58 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 54 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना सातारा जिल्हा एक नजर

- आजपर्यंत घेतलेले नमुने : 28 हजार 425

- एकूण बाधितांची संख्या : 4 हजार 52

- उपचार घेणारे रुग्ण : 1 हजार 863

- बरे झालेले लोक : 2 हजार 36

- कोरोनामुळे मृत्यू : 130

सोलापूर जिल्ह्यात 250 कोरोनाबाधितांची भर, 8 जणांचा मृत्यू

सोलापूर- सोलापूर मध्ये कोरोना महामारीचे थैमान सुरूच आहे, शुक्रवारी शहर जिल्ह्यात मिळून 250 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 188 रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झालेत आहेत. कोरोना विषाणूने शुक्रवारी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजतागायत सोलापूरच्या ग्रामीण भागात एकूण 103 रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे.

आजपर्यंतची कोरोना स्थिती.

पॉझिटिव्ह

शहर -4985

ग्रामीण- 3653

एकूण -8638


मृत

शहर -359

ग्रामीण -103

एकूण -452

ABOUT THE AUTHOR

...view details