महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत यंदा दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाची संख्या ५ हजाराने घटली - ganesh idol

मुंबईत ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदा दीड दिवसाच्या ६१ हजार ९२९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तींची संख्या ५ हजाराने घटली आहे.

मुंबईत दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

By

Published : Sep 6, 2019, 8:11 AM IST

मुंबई- दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नुकतेच करण्यात आले. गेल्यावर्षी दीड दिवसाच्या ६७ हजार ७७८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. मात्र, यंदा ६१ हजार ९२९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ही आकडेवारी पाहिल्यास गेल्या वर्षांपेक्षा यंदा दीड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत तब्बल ५ हजार ८४९ मूर्तींनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन

पर्यावरणपूरक बाप्पा.! ३३०० पेन्सिलची आरास, विसर्जनानंतर विद्यार्थ्यांना देणार भेट

मुंबईत ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यंदा दीड दिवसाच्या ६१ हजार ९२९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये घरगुती ६१ हजार ७२८, तर सार्वजनिक २०१ मूर्तींचा समावेश होता. गेल्यावर्षी दीड दिवसांच्या ६७ हजार ७७८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामध्ये सार्वजनिक मूर्तींची संख्या ४०७, तर घरगुती मूर्तींची संख्या ६७ हजार ३७१ एवढी होती.

पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाने साकारली पेशवाईची साक्ष देणाऱ्या 'शनिवारवाड्या'ची प्रतिकृती

पर्यावरणाचे रक्षणासाठी मुंबई महापालिका दरवर्षी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देते. यंदा कृत्रिम तलावात १४ हजार ४९० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक ४८, तर घरगुती मूर्तींची संख्या १४ हजार ४४२ इतकी आहे. गेल्यावर्षी कृत्रिम तलावात १५ हजार १५० होती. त्यामध्येही सार्वजनिक गणेश मूर्तींची संख्या ९१ होती, तर घरगुती मूर्तींची संख्या १५ हजार ५९ एवढी होती. कृत्रिम तलावातील गणेश मूर्तींची संख्येमध्ये ६६० ने घट झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details