मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्याच्या सभेत माहीम दर्ग्याच्या मागे खाडीत एका धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला असता, मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम हटवले आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी सांगितले आहे की, राज ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केल्यावर अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकाम लगेच हरवले जाते. पण, अशी अनेक अनधिकृत बांधकामे मुंबईत आहेत. त्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. फक्त हिंदू-मुसलमान असा भेदभाव करून चालणार नाही.
हिंदू मुसलमान एकत्र नांदायला पाहिजेत :देशात, जगात शांती पाहिजे तर हिंदू मुसलमान एकत्र नांदायला पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उत्तर प्रदेशातून येतात त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांची अनेक मंदिर आहेत व तिथे मुस्लिमांची संख्या सुद्धा जास्त आहे. परंतु अशा पद्धतीने भेदभाव करणे योग्य नाही असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्याशी खास बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह या सरकारवर जोरदार टीका केली.