महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2020, 6:39 PM IST

ETV Bharat / state

कोरोना : लवकरच धारावी पॅटर्न इतरही झोपडपट्ट्यांमध्ये?

धारावीत शनिवारपासून डोअर टू डोअर स्क्रिनिंगला सुरुवात झाली आहे. रहिवाशांचा मोठा आकडा, चिंचोळ्या गल्लीबोळातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे सद्या अडचणी येत आहेत. कोणत्याही परिस्थितीत धारावीत हा प्रयोग यशस्वी करत कॊरोनाला हरवायचे असा दृढ निश्चय आयअमएने केला आहे. धारवीचा पॅटर्न इतरही झोपडपट्ट्यात राबविणार असल्याची माहिती आयएमएचे पदाधिकारी डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली.

IMA Officer Shiv Kumar Utture comment on Dharavi slum
लवकरच धारावी पॅटर्न इतरही झोपडपट्ट्यांमध्ये?

मुंबई - धारावीत शनिवारपासून डोअर टू डोअर स्क्रिनिंगला सुरुवात झाली आहे. रहिवाशांचा मोठा आकडा, चिंचोळ्या गल्लीबोळातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे सद्या अडचणी येत आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत धारावीत हा प्रयोग यशस्वी करत कॊरोनाला हरवायचे असा दृढ निश्चय इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मुंबई महानगर पालिकेने केला आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याची खात्री झाल्यास मुंबईतील इतर रेड झोनमधील झोपडपट्ट्यामध्येही धारावी पॅटर्न राबवण्याचा विचार असल्याची माहिती आयएमएचे पदाधिकारी डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली.

लवकरच धारावी पॅटर्न इतरही झोपडपट्ट्यांमध्ये?


साडे सात लाख लोकवस्ती, दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, ठरवूनही सोशल
डिस्टन्सिंग न पाळत येणे अशा अडचणी असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोना फैलावत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेची चिंता वाढली आहे. त्यातूनच परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच धारावीसाठी विशेष कृती आराखडा हाती घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणजे डोअर टू डोअर स्क्रिनिंग. आयएमए आणि पालिकेच्या 5 टीम कालपासून स्क्रिनिंग करत आहेत. आतापर्यंत किमान 2 हजार घरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग पूर्ण केल्याचे उत्तुरे यांनी सांगितले आहे. छोट्या गल्ल्या आणि लोकांना समजून सांगत पुढे आणणे हे मोठे आव्हान आहे, पण आमचे डॉक्टर ते काम करत असल्याचेही ते म्हणाले.



आता टीम वाढवत शक्य तितक्या लवकर हे काम यशस्वीपणे पूर्ण करणे हेच उद्दिष्ट सध्या आहे. धारावीत हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच आम्ही वडाळा, चेंबूर, पवई अशा झोपडपट्ट्यांमध्येही हा पॅटर्न राबण्यासाठी तयार आहोत. पण धारावीत बाजी मारल्यानंतरच पुढच्या झोपडपट्ट्यांकडे आम्ही वळू असे ही उत्तुरे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details