मुंबई -इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अनेक डॉक्टर कोरोनाच्या लढाईत उतरले आहेत. धारावीसारख्या परिसरात रुग्णसेवा देत आहेत. आता यापुढे जात या डॉक्टरांनी कस्तुरबा रुग्णालयाला 3 लाखांच्या इंजेक्शनची मदत दिली आहे. इंजेक्शन टोसिलीझुमॅब नावाचे हे इंजेक्शन असून ते गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरतात.
IMA डॉक्टर्सकडून कस्तुरबा रुग्णालयाला 3 लाखांच्या इंजेक्शनची मदत, IL-6 लेव्हल टेस्टचा खर्चही उचलणार - कोरोना व्हायरस
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अनेक डॉक्टर धारावीसारख्या परिसरात रुग्णसेवा देत आहेत. आता यापुढे जात या डॉक्टरांनी कस्तुरबा रुग्णालयाला 3 लाखांच्या इंजेक्शनची मदत दिली आहे. इंजेक्शन टोसिलीझुमॅब नावाचे हे इंजेक्शन असून ते गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरतात.

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे गंभीर रुग्णांची संख्या अधिक असून अशा रुग्णांसाठी इंजेक्शन टोसिलीझुमॅबचा वापर करण्यात येतो. या इंजेक्शनची कमतरता भासू नये आणि इंजेक्शनच्या खर्चाचा भार थोडा तरी कमी करावा म्हणून आयएमए आणि एमएमसीने पुढे येत 3 लाखांची इंजेक्शन मदत म्हणून दिली आहेत, अशी माहिती आयएमएचे पदाधिकारी डॉ. अनिल पाचनेकर यांनी दिली आहे.
एमएमसीचे अध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे यांच्या हस्ते ही मदत कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉ पंकज भांडारकर, डॉ पाचनेकर ही उपस्थित होते. दरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची आयएल-6 लेव्हल टेस्ट करण्यात येत. या चाचणीचा खर्च ही आता डॉक्टरांच्या या दोन्ही संघटना उचलणार आहेत.