मुंबई- राज्यभरातील खासगी डॉक्टरांची 95 मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्यूपमेंट किट) किटची गरज पूर्ण व्हावी, यासाठी डॉक्टरांनी आता थेट सर्वसामान्यानाचा साकडं घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही अत्यावश्यक साधन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उभारण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने घेतला आहे.
आर्थिक मदतीसाठी आयएमएचे सर्वसामान्यांना साकडे, मास्क आणि किटसाठी उभारणार निधी - कोरोना विषाणू
कॊरोनासारख्या गंभीर आजाराशी लढताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना 95 मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई किट अत्यंत आवश्यक आहे. पण, सद्या साठेबाजीमुळे 95 मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुडवडा आहे. तर यांच्या किंमतीतही कृत्रिम वाढ झाली आहे.
कॊरोनासारख्या गंभीर आजाराशी लढताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना 95 मास्क, सॅनिटायझर्स आणि पीपीई किट अत्यंत आवश्यक आहे. पण, सद्या साठेबाजीमुळे 95 मास्क आणि सॅनिटायझर्सचा तुडवडा आहे. तर यांच्या किंमतीतही कृत्रिम वाढ झाली आहे. त्याचवेळी सर्वात महत्वाच्या महत्त्वाच्या पीपीई किटची उपलब्धताच कमी असून ह्याच्याही किमती खासगी डॉक्टरांना परवडत नसल्याचे आयएमए, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. तर याच करणामुळे खासगी दवाखाने बंद ठेवावी लागत असल्याचंही त्यांचे म्हणणं आहे.
सरकारी डॉक्टरांप्रमाणे आम्हालाही मोफत आणि माफक दरात ही साधनं उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी सरकारकडे सातत्याने आम्ही करत आहोत. पण, ही मागणी काही मान्य होत नसून आता आमच्यावरच कारवाईचा बडगा उचलला जात आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही या साधनांच्या खरेदीसाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतल्याचेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच या निधी जमा करण्याच्या कामाला सुरुवात होणार असून याला प्रतिसाद मिळाल्यास नक्कीच खासगी डॉक्टरांना मोठी मदत होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.