मुंबई :कोरोना काळात अनेक डॉक्टर आणि नर्स सेवा न देता पळून गेले. या वादग्रस्त वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाली असून, राज्यभर संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र, आपल्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर इंडियन मेडिकल असोसिएशन चांगलीच आक्रमक झाली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमकप्रसारमाध्यमांशी मुंबईत संवाद साधताना कोविड काळामध्ये अनेक डॉक्टर, नर्स सेवा न देताच पळून गेले असे वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाली असून, संजय राऊत जोपर्यंत हे विधान मागे घेऊन माफी मागत नाही, तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही. संपूर्ण राज्यभर संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शने केली केली जातील, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. मात्र, आता संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर आज मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सारवासराव करण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत यांचा वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्नआपण डॉक्टरांच्या विरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. कोरोना काळात सर्वच डॉक्टरांनी जे काम केले आहे, त्याची तुलना करता येणार नाही. त्यावेळी पांढऱ्या कपड्यातले ते देवदूत होते, असे विधान आता संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी, आता इंडियन मेडिकल असोसिएशन यासंदर्भात नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.