महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध सिगारेटचा 'धूर', साडेचौदा कोटींच्या बेकायदेशीर सिगारेट महसूल गुप्तचर विभागाकडून जप्त - साडेचौदा कोटींच्या बेकायदेशीर सिगारेटी

DRI Seizes Illegal Cigarettes : देशाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटनं न्हावाशेवा बंदरातून 14 कोटी 67 लाख रुपयांच्या बेकार 86 लाख 30 हजार इतक्या सिगारेट हस्तगत केलेल्या आहेत.

Illegal cigarettes worth fourteen and a half crores seized by Directorate of Revenue Intelligence in mumbai
महसूल गुप्तचर विभागानं पकडल्या साडेचौदा कोटींच्या बेकायदेशीर सिगारेटी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 8:47 AM IST

मुंबई DRI Seizes Illegal Cigarettes :मुंबईमध्ये प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी न्हावाशेवा बंदरात 4 डिसेंबर रोजी 40 फूट लोखंडी कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना आढळला. अधिकाऱ्यांना या कंटेनरवर संशय आल्यानं त्यांनी त्याची तपासणी करण्याचं निश्चित केलं. त्यानंतर संबंधित शिपिंग कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी केली.



कंटेनर पाहून संशय बळावला :यावेळी शिपिंग कंपनीच्या उपस्थित असलेल्या काही लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळंच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा संशय अजून वाढला. याबाबत त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कंटेनर प्रत्यक्ष उघडायला लावला.



कंटेनर उघडताच आढळल्या अवैध सिगारेट :मुंबई विभागाच्या महसूल गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कंटेनरचं कुलूप उघडलं. दरवाजा उघडून आत पाऊल टाकताच त्यांना बेकायदेशीर सिगरेट आणि तंबाखू संबंधित अमली पदार्थ असलेल्या सिगारेट अन् त्या पद्धतीचे पदार्थ सापडले. तब्बल 86 लाख 30 हजार सिगारेट या कंटेनरमध्ये आढळल्या आहेत. बाजारभावानुसार त्यांची एकूण किंमत 14 कोटी 67 लाख रुपये आहे.


बेकायदेशीर सिगारेट वेळीच जप्त केल्या :महसूल गुप्तचर संचालनालयाला खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष न्हावाशेवा बंदरावर तपासणी केल्यामुळं हा कट उघडकीस आला. यामध्ये सहभागी असलेल्या आरोपीवर सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई गुप्तचर महसूल संचालनालयाचे मुंबई विभागाचे अतिरिक्त संचालक सुनील कुमार माल यांच्या निदर्शनाखाली करण्यात आली. बेकायदेशीर सिगारेट चोरून आणणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. ही कारवाई 9 डिसेंबर रोजी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details