महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Climate Correction Day : क्लायमेट करेक्शन डे चॅलेंज; बिगर इस्त्री केलेले कपडे घाला आणि क्लायमेट चेंजला रोखा - आयआयटी प्राध्यापक चेतन सोळंकी

बिगर इस्त्री केलेले कपडे घाला आणि क्लायमेट चेंजला रोखण्यात मदत कराक्लायमेट चेंज रोखण्याचे दहा वर्षापासूनच सुरू असलेले अनोखे आंदोलन. ( Wear non ironed clothes ) आयआयटीचे प्राध्यापक चेतन सोळंकी यांचे एनर्जी स्वराज, विशेष मोहीम दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील यांनी त्याबाबत मिळवले आहेत. ( help prevent climate change ) दहा वर्षे झाले घरदार सोडून फक्त बस मध्येच राहतात आणि क्लायमेट चेंज रोखण्यासाठी आंदोलन करतात. एकदा इस्त्री केलेले कपडे घातले. तर 200 ग्राम कार्बन डायऑक्साइड वायू निघतो. सध्या क्लायमेट करेक्शन डे चॅलेंज अनोखी मोहीम सुरू आहे, जाणून घेऊया सविस्तरपणे. (Climate Correction Day Challenge)

By

Published : Jan 8, 2023, 2:22 PM IST

Climate Correction Day Challenge
क्लायमेट करेक्शन डे चॅलेंज

क्लायमेट करेक्शन डे चॅलेंज

मुंबई :आंदोलन धरणे मोर्चे असे म्हटले की आपल्याला रस्त्यावर आक्रमकपणे जनता विविध फलक घेऊन झेंडे, बॅनर घेऊन घोषणा देताना गाणे म्हणताना तालबद्ध चालताना विविध प्रकारे आंदोलन आपल्या डोळ्यासमोर येतात. ( Wear non ironed clothes ) मात्र आयआयटी मुंबईमध्ये काम करणारे प्राध्यापक चेतन सोळंकी यांनी ऊर्जा बचती संदर्भात अनोखी मोहीम सुरू करून दहा वर्षापासून आंदोलन सुरू केलेला आहे. (Climate Correction Day Challenge) याचे वैशिष्ट्य असे की ते घरदार सोडून केवळ एका बस मध्येच राहतात. (IIT Professor Chetan Solanke )



आंदोलन दहा वर्षापासून सुरू : एकदा इस्त्रीचे केलेले कपडे घातले तर 200 ग्राम कार्बन डायऑक्साइड वायू निघतो. असा दावा करतात प्राध्यापक आणि ऊर्जे विषयीचे अभ्यासक संशोधक चेतन सोलंकी यांनी गेल्या दहा वर्षापासून आपले घर आणि दार सोडले आहे. ते देशभर प्रवास करतात यात्रा करतात आणि त्यासाठी त्यांनी जनतेकडून मिळालेली मदत तिच्या आधारावर एक बस घेतली आहे. त्या सूर्यावर चालणाऱ्या बसमध्ये राहतात आणि तेथूनच त्यांचे हे अनोख आंदोलन दहा वर्षापासून सुरू आहे.



काय आहे ऊर्जा स्वराज यात्रेचा उद्देश :प्राध्यापक सोळंकी यांचे म्हणणे आहे की, जगातील प्रत्येक माणूस आपण सर्व ऊर्जेचा वापर आणि गैरवापर दोघेही नियमितपणे करत आलेलो आहे. मग त्यामध्ये गरीब श्रीमंत कंपनीचे मालक कंपनीचा नोकर छोटे मोठे आणि कोणत्याही स्तरातले व्यक्ती याला हातभार लावत असतात त्याचे कारण आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्येच प्रचंड ऊर्जा आपण वापरतो आणि त्या पद्धतीमध्येच कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो.


शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली : कितीही पर्यायी तंत्रज्ञान वापरले तरी कार्बन डायऑक्साइड कमी होत नाही म्हणून हे करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या कार्बन डायऑक्साइडला रोखण्यासाठी अनेक प्रकारचे नवीन तंत्रज्ञान वापरले जातात. मात्र तरी कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण वाढतच आहे. जर पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण थांबवले नाही. आपण नष्ट हो ही देखील शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केलेलीच आहे. आणि म्हणून त्याला रोखायचे म्हणजेच क्लाइमेट चेंजला रोखायचे. हे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात दारात कुठेही बसून करू शकतात. इतके साधे आणि सहज आणि सोपे असे हे आंदोलन आहे. त्यामुळे आपले जीवन हे क्लायमेट चेंजच्या रोखण्याच्या दिशेने असायला हवे. या उद्देशाने त्यांनी बिगर पगारी दहा वर्षाची रजा घेत आयटी मुंबई सोडून देशभर यात्रा करत आहेत.


बिगर इस्त्री केलेले कपडे वापरा वातावरणामध्ये बदल घडवा :यासंदर्भात नुकतेच काल पासून त्यांनी क्लायमेट करेक्शन डे असा उपक्रम सुरू केलेला आहे. या संदर्भात हा उपक्रम नेमका काय आहे आणि तो कसा चालला जाणार याबद्दल प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी भारत सोबत बातचीत करताना सांगितले. आम्ही 4 जानेवारी 2023 पासून एक महत्त्वाचा अत्यंत धडाडीचा उपक्रम सुरू केलेला आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर एक एलईडी बल्ब लावला तर तो 10 ते 40 वॅट इतकी ऊर्जा त्यामधून तयार होते. मात्र तुम्ही जर एक इस्त्री सुरू केली आणि तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे इस्त्री करत राहिलात तर त्यातून सहाशे ते बारा वॅट एवढी ऊर्जा लागते, तेवढी पॉवर लागते. एलईडी बल पेक्षा 30 पटीने जास्त तुम्ही आम्ही विनाकारण ती ऊर्जा वापरतो. कपडे इस्त्री केल्यामुळे एक किलो इतका कार्बन डायऑक्साईड त्याचे उत्सर्जन होते म्हणजेच तो हवेमध्ये पसरतो. जगातील कोट्यावधी लोक इस्त्रीचे कपडे रोज वापरतात म्हणजे आपला विनाश अटळ.



लाइफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट :प्राध्यापक चेतन सोळंकी यांचे म्हणणे आहे की, हे कोणीही व्यक्ती सहज सोप्या पद्धतीने बिगर इस्तरी केलेले कपडे घालू शकतात याचं कारण आपल्याला लागणार अन्न आपल्याला लागणार तेल भाजीपाला फळे इतकी काही गरजेची गोष्ट इस्तरी नाही त्यामुळे लोकांनी इस्त्रीचे कपडे घालण्याचे टाळावे म्हणजेच क्लाइमेट चेंज रोखण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणार आहे आणि यासाठी आपल्या घरापासून स्वतःपासून सुरुवात करायची आहे.ही त्यांची घोषणा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने 2021 मध्ये सुरू केलेली मोहीम जिचा गौरव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे लाईफस्टाईल फॉर एनर्जी लाइफस्टाइल फॉर एन्व्हायरमेंट याचची सुसंगत आहे.


क्लायमेट करेक्शन डे कार्यक्रम सुरू :यासंदर्भात प्राध्यापक चेतन सोलंकी यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आपण आपल्या घरापासून क्लायमेट चेंज रोखायला आतापासून सुरुवात करू शकतो. म्हणजे की विनाकारण ऊर्जेचा वापर टाळा. गरज आहे तिथेच दिवे दिव्यांचा वापर करा. आपण इस्त्रीने जे कपडे प्रेस करतो म्हणजे इस्तरी करतो ते कपडे घालणे टाळा. इस्त्री चे कपडे घालण्याची ही आपली काही मूलभूत गरज नाही. त्यामुळे ते जर टाळले तर क्लायमेट चेंज आपल्याला रोखता येईल. त्यामुळे हे आंदोलन लहान मोठा श्रीमंत गरीब कोणत्याही देशातला नागरिक आत्तापासून सुरू करू शकतो. आम्ही नुकतेच क्लायमेट करेक्शन डे नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये शालेय वयातील मुले कॉलेजमधील विद्यार्थी आणि नागरिक यांनी ऑनलाइन उर्जे बचतीच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यांनी आपले वर्तन देखील त्यारीतीने ठेवायचे आहे. इतका साधा सोपा आणि कोणत्याही नागरिकाला जमेल असा हा क्लायमेट करेक्शन डे कार्यक्रम सुरू झाला आहे.


सौरऊर्जा जागरुकता : एकदा इस्त्रीचे केलेले कपडे घातले तर 200 ग्राम कार्बन डायऑक्साइड वायू निघतो. 10 लाख विद्यार्थ्यांना स्वतःचा सौर दिवा बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या मिशनसाठी चेतन सोलंकी यांनी 30 देशांची सौरयात्रा काढली. त्यांचा पुढचा प्रयत्न म्हणजे 11 वर्षांचा मुक्काम आणि सौरऊर्जा जागरुकता पसरवण्यासाठी देशभरात सौर बसमध्ये प्रवास करणे.

ABOUT THE AUTHOR

...view details