मुंबई :जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईने मोठी भरारी घेतली आहे. मुंबई आयआयटीने 149 वे स्थान पटकावून जागतिक दीडशे विद्यापीठांच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. मागच्या वर्षी मुंबई आयआयटीचा 172 वा क्रम होता. मागच्या वर्षी पेक्षा यंदाची कामगिरी अधिक चमकदार आणि प्रगतिशील अशी आहे.
अध्यापन आणि संशोधनातील उत्कृष्टता हा IIT बॉम्बेचा मुख्य प्रेरणास्त्रोत आहे.आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणे हे आमचे प्रयत्न आहेत. उच्च श्रेणी प्राप्त करणे हे केवळ अनुषंगाने उपउत्पादन आहे आणि हे स्वतःचे ध्येय नसते. मला खात्री आहे की आयआयटी बॉम्बेला अजून मैलांचा पल्ला गाठायचा आहे - प्रा. सुभाषिस चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई
जागतिक विद्यापीठ क्रमवारीत झेप :इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे) भारतातील क्रमांक एक वर आहे. तर क्वाक्वेअरल सायमंड्स (05) जागतिक विद्यापीठ क्रमवारीत गेल्या वर्षीच्या 172 क्रमांकावरून यावर्षी 149 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबई आयआयटीला एकूण 100 पैकी 51.7 गुण प्राप्त झाल्याने हा क्रम मिळाला आहे. आयआयटी बॉम्बेने 05 रँकिंगमध्ये पहिल्या 150 मध्ये स्थान मिळवले आहे. एकूणच, संस्थेने 2023 च्या 172 स्थानावरून कामगिरीत 23 क्रमाने सुधारणा केली आहे. या शिक्षण संस्थेच्या मूलभूत सोयी सुविधा, अभ्यासक्रम शिकवणारे प्राध्यापक अश्या अनेक बाबीत आयआयटीने प्रगती केली.
आयआयटी मुंबईचे यश :क्यूएस QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या 2024 या वर्षी आयआयटी मुंबईला जगातील शीर्ष 1500 विद्यापीठांपैकी पहिल्या 10 टक्केमध्ये स्थान देण्यात आले आहे. ज्यांना Q5 मानांकन योग्य मानले गेले आहे, त्यात आयआयटी मुंबई आहे.
या विभागात आयआयटी मुंबईला मिळाले गुण :बुधवारी जागतिक Q5 द्वारे हे निकाल जाहीर करण्यात आले. संस्थेला प्रतिष्ठेमध्ये 81.9 गुण, शिक्षक प्रतिष्ठेमध्ये 73.1 टक्के गुण तर शैक्षणिक प्रतिष्ठेमध्ये 55.5 टक्के गुण मिळाले आहेत. रोजगार प्राप्त करवून देण्यात 47.4 गुण आहेत. शाश्वत टिकाऊपणामध्ये 54.9 टक्के गुण, तर 18.9 टक्के गुण प्राध्यापक विद्यार्थी गुणोत्तर या क्षेत्रात प्राप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्याशाखेमध्ये 4.7 इतके गुण आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्कमध्ये 8.5 गुण मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबईने 1.4 गुण मिळालेले आहेत. या नऊ पॅरामीटर्सपैकी, एम्प्लॉयर रेप्युटेशनने IIT बॉम्बेसाठी जागतिक स्तरावर ६९ रँकसह सर्वात मजबूत असल्याचे या क्रमवारीत दिसून आले.
संशोधनातील उत्कृष्टता मुख्य प्रेरणास्त्रोत :अध्यापन आणि संशोधनातील उत्कृष्टता हा IIT बॉम्बेचा मुख्य प्रेरणास्त्रोत असल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिस चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणे हे आमचे प्रयत्न आहेत. उच्च श्रेणी प्राप्त करणे हे केवळ अनुषंगाने उपउत्पादन आहे, हे स्वतःचे ध्येय नसते. आयआयटी मुंबईला अजून मैलांचा पल्ला गाठायचा असल्याचे संचालक प्रा सुभाषिस चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
आयआयटी मुंबईची प्रगती
- जागतिक क्रमवारीत 172 वरून 149 वे स्थान पटकावले
- एम्प्लॉयर रेप्युटेशनने IIT बॉम्बेची 69 गुण मिळवून जगात चमकदार कामगिरी
- एकूण 100 पैकी 51.7 गुण आयआयटी मुंबईला मिळाले
- आयआयटी मुंबईने 05 रँकिंगमध्ये पहिल्या 150 मध्ये मिळवले स्थान
हेही वाचा -
- Bamboo Processing : आयआयटीने बांबूवर प्रक्रिया करणारे टूलकिट केले विकसित; नवीन तंत्र आणि यंत्राचा होतोय वापर
- Indias First Microfactory आयआयटी बॉम्बेमध्ये देशातील पहिला सूक्ष्म कारखाना सुरू