महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयआयटी मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांचे पॅकेज, 'या' क्षेत्रातून मिळाल्या सर्वाधिक ऑफर - IITB 85 students

IIT Bombay placements आयआयटी मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीत यश मिळवून वार्षिक 1 कोटी रुपयांचे पॅकेज मिळविलं आहे. आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यातच विविध कंपन्यांनी 1,340 विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे नोकरी कपात होण्याचं प्रमाण वाढलेल्या आयटी क्षेत्रातूनही विद्यार्थ्यांना चांगल्या ऑफर मिळाल्या आहेत.

IIT Bombay placements
IIT Bombay placements

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 10:05 AM IST

मुंबई IIT Bombay placements - देशभरात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं चिंता व्यक्त होत असते. अशातच शैक्षणिक क्षेत्रासाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकी क्षेत्रात अधिक संधी मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर्स मिळाल्या आहेत. 20 डिसेंबर 2023 पासून विविध कंपन्यांकडून आयआयटी विद्यार्थ्यांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती वर्ष अखेरीस संपल्या आहेत.

आयआयटी मुंबईच्या टेक्नॉलॉजी फेस्टिव्हलसोबत 'जॉब प्लेसमेंट' 20 डिसेंम्बर 2023 पासून सुरू झाले. या टप्प्यात एकूण 1,340 जॉब ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आयआयआयटी मुंबईच्या 1 हजार 118 विद्यार्थ्यांना संधी ( IIT Bombay Job offers) मिळाल्या आहेत. कंपन्यांनी आयआयटी मुंबई कॅम्प्स येथे तसंच ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात प्रिऑफर प्लेसमेंटदेखील आहेत.

आयआयटी मुंबई



कॅम्पस मुलाखतींचे हे राहिले वैशिष्ट्य

  • जे विद्यार्थी इंटर्नशिप करीत होते, अशा 297 पैकी 258 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या आहेत.
  • ऑफर्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऍपल कंपनी, एयरबस, एयर इंडिया, डी लिटल, बजाज, बरकलेज, दा विंची, फलटर्न, फ्युचर फर्स्ट, ग्लोबल एनर्जी इव्हायर्नमेंट, गुगल , होंडा, आयसीआयसीआय लोंबर्ड, इंटेल, जग्वार, जे. पी. मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट, मर्सडीज बेंझ, सॅमसंग अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी व खासगी दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना ऑफर आलेल्या आहेत.
  • या जॉब ऑफर्समध्ये आयटी, तंत्रज्ञान, वित्त , बँकिंग, संशोधन व विकास, डिझाइन तसेच सर्वात अधिक सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकी या क्षेत्राचा समावेश आहे.
  • वार्षिक सरासरी 1 कोटी रुपये पगाराच्या ऑफर जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर, हॉंगकॉंग, अमेरिका इत्यादी देशातील कंपन्यांनी दिल्या आहेत.


    सर्वाधिक अभियांत्रिकी विषयात नोकरीच्या संधी -विद्यार्थ्यांना विशेष करून अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्याकडून अधिक मागणी आहे. भारतीय स्तरावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून सरासरी वार्षिक पगार 21 लाख 88 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली. तर सॉफ्टवेअरमध्ये 26 लाख 85 हजार रुपये, वित्त क्षेत्रात 32 लाख 38 हजार रुपये, सल्लागार क्षेत्रात सरासरी वार्षिक पगार 18 लाख 68 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली. तर संशोधन विकासासाठी 36 लाख 94 हजार रुपये इतक्या सरासरी वार्षिक पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्याचं आयआयटी मुंबईच्या प्रवक्त्यानं सांगितले.

विद्यार्थी तणावमुक्तीसाठी उपक्रम-आयटी मुंबईतील विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी करण्याकरिता विविध उपक्रम घेण्यात आले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कलेतून व्यक्त करण्याकरिता रंग, ब्रश, कॅनव्हास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तणावमुक्तीकरिता डॉग थेरपीच्या माध्यमातून केंद्रात दोन कुत्री ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याशी खेळून विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात.

हेही वाचा-

ABOUT THE AUTHOR

...view details