महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई आयआयटीने बनवले शाळांना परवडणारे मायक्रोस्कोप - विज्ञान प्रदर्शन मंबई बातमी

शाळा-महाविद्यालयातील प्रयोगशाळेत महागडे मायक्रोस्कोप परवडणारे नसतात. त्यामुळे प्रयोग घेण्याचे टाळले जाते. यावर पर्याय शोधण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान व जैव विभागाने 100x पर्यंत मॅग्नेफिकेशन असणाऱ्या मायक्रोस्कोपची निर्मिती केली आहे.

iit Bombay -develop-microscope-for-schools-in-mumbai
iit Bombay -develop-microscope-for-schools-in-mumbai

By

Published : Jan 6, 2020, 9:52 AM IST

Updated : Jan 6, 2020, 10:12 AM IST

मुंबई-आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. यात शाळा-महाविद्यालयांना परवडणारे मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शक) मुंबई आयआयटीच्या जैव विज्ञान व जैव अभियांत्रिकी विभागाने तयार केले आहे. मायक्रोस्कोपच्या प्रतिमा मोबाईलमध्ये पण घेता येणार आहेत. लवकरच हे मायक्रोस्कोप बाजारात येणार असल्याचे संशोधक विश्वंभर भंडारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

आयआयटीने बनवले शाळांना परवडणारे मायक्रोस्कोप

हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

शाळा-महाविद्यालयातील प्रयोगशाळेत महागडे मायक्रोस्कोप परवडणारे नसतात. त्यामुळे प्रयोग घेण्याचे टाळले जाते. यावर पर्याय शोधण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान व जैव विभागाने 100x पर्यंत मॅग्नेफिकेशन असणाऱ्या मायक्रोस्कोपची निर्मिती केली आहे. या मायक्रोस्कोपची किंमत केवळ 50 रुपये असणार आहे. यात प्रयोगाची काच ठेवण्यासाठी पोकळी ठेवण्यात आली आहे. यात अधिक संशोधन करून दुसरा एक स्मार्ट बेस्ट मायक्रोस्कोप बनवण्यात आला आहे. या मायक्रोस्कोपमध्ये मोबाईलचा कॅमेरा वापरून व्हिडिओ चित्रिकरण करू शकतो. संशोधकांनीया मायक्रोस्कोपची अधिक प्रगती करून वेब केम बेस मायक्रोस्कोप बनवला आहे. हा 600x पर्यन्त मॅग्नेफिकेशन असून त्याची किंमत 500 रुपये आहे. या मायक्रोस्कोपमध्ये सर्व प्रकारचे झाडे, प्राणी, विषाणू पाहता येतात. लवकरच हे मायक्रोस्कोप बाजारात येणार आहे.

Last Updated : Jan 6, 2020, 10:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details