मुंबई - मुंबई स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, मुंबईत आता प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात आता वर्दळ दिसते. मोकळा श्वास घेणेही अवघड झालेला आहे. म्हणून मुंबई आता राहण्याचे ठिकाण राहिलेला नाही, असे मत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच मोकळं, आनंदित आयुष्य जगायचं असेल तर शेतावर गावाकडे गेले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नाना पुढे म्हणाले, आयुष्यात खूप वरदायी जगताना जर खरच शांतता मोकळेपणा आणि आनंद अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने एकदा गावाकडे शेतावर आला पाहिजे. त्यातून नक्कीच आनंद मिळतो. गावाकडे शेतावर असताना खूप बदल आपल्याला जाणवतो. आत्ता मी हाच अनुभव गावाकडे शेतावर घेतो आणि शेतीची काम करत असताना मला खूप आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.