मुंबई:त्यानंतर चार ते पाच दिवसाने त्वरित सात हजार रुपये कर्ज फेडावे यासाठी अनुरागला सातत्याने त्याच्या मोबाईलवर फोन येऊ लागले. आपल्याला पूर्ण सात हजार रुपये न मिळाल्याचे अनुरागने सांगितल्यानंतर कॉलर ने त्याला शिवीगाळ सुरू केला. तसेच पैसे न दिल्यास अनुराग सिंग यांचा फोटो मार्फ करून सोशल मीडियावर (On social media) वायरल करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. धमकीचे फोन येणारे नंबर ब्लॉक केल्यानंतर ही इतर नंबर वरून सातत्याने अनुरागला कॉल करून धमकावले जात होते.
अनुराग सिंह या तरुणाने कुरार पोलीस स्टेशनमध्ये याबाबत 8 मे ला सविस्तर तक्रार नोंदवली आहे. या ॲप ची लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुराग सिंग त्याला सापडली होती. त्या लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घेतले होते. आणि त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि आपला मोबाईल नंबरची माहिती या आप मध्ये त्याने समाविष्ट केली. त्यानंतर लगेचच त्याच्या खात्यात 3800 रुपये जमा झाले.