मुंबई - केंद्रसरकार विरुद्ध राज्यसरकार हे वाद काही संपताना दिसत नाही आहे. पद्म पुरस्कारावरून सुद्धा हा वाद दिसून आला आहे. संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. दरवर्षी महाराष्ट्रातून दहा ते बारा लोकांना पद्म पुरस्कार देण्यात येतात मात्र या वर्षी फक्त सहा लोकांनाच पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याबद्दल संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकारकडून ज्यांना पद्म पुरस्कार द्यायचा आहे, त्यांच्या नावाची शिफारस केली जाते. मात्र राज्य सरकारने पाठवलेल्या नावांपैकी एकाही नावाला पद्म पुरस्कार देण्यात आले नसावे अशी शंकासुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होत असेल तर त्याची नोंद घ्यावी लागेल- संजय राऊत - Sanjay Raut LATEST NEWS
संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. दरवर्षी महाराष्ट्रातून दहा ते बारा लोकांना पद्म पुरस्कार देण्यात येतात मात्र या वर्षी फक्त सहा लोकांनाच पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याबद्दल संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली.
पुरस्कारांमध्ये देखील मनमानी