मुंबई : शिंदे सरकारने नुकताच राज्यासाठी 49 हजार कोटीची गुंतवणूक केल्याचा करार केला आहे. याबाबत पवार यांना छेडले असता, महाराष्ट्रात गुंतवणूक येऊन तरुणांना रोजगार मिळत असेल, तर आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून मोठी गुंतवणूक बाहेरच्या राज्यात गेल्याने लाखो तरुणांचा यामुळे रोजगार गेला आहे. शिंदे फडणवीस सरकारने याबाबत आत्मचिंतन करायला हवे. काही हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, असे सरकार सांगत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती प्रकल्प येतात. हे आगामी कळेल असा पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री सुभाष देसाई, आदित्य ठाकरे हे दाओसला गेले होते. शिंदे फडणवीर सरकारने कोणाला पाठवावे हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. मात्र, राज्यासाठी गुंतवणूक यायला हवी, असही पवार म्हणाले आहेत.
हिंदी भाषा राष्ट्रभाषा व्हायला हवी : राष्ट्रभाषा हिंदी करावी, यावर ही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठी महाराष्ट्रात बोलली जाते. पण राष्ट्रभाषा हिंदी करावी की नाही यावर मतमतांतर आहेत. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला हिंदी भाषा राष्ट्रभाषा व्हायला हवी, असे वाटते असही अजित पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकारने त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असेही पवार म्हणाले आहेत. दरम्यान, पवार यांनी यावेळी बँकांच्या सीबीलवरून ही सरकारला जाब विचारला आहे.