मुंबई - "जर म्यानमारचे रोहिंग्या व पाकिस्तानी भारतात येऊ शकतात तर मी बेळगावमध्ये का येऊ शकत नाही?" असा, सवाल करत शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपप्रणित कर्नाटक सरकारला फटकारले होते. शनिवारी राऊत हे बेळगावात आले, मात्र, कर्नाटक सरकारने त्यांना विरोध केला.
- संजय राऊतांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा
- महाराष्ट्रात कन्नड संस्कृती जपण्याचा प्रयत्न - राऊत
- बाळासाहेब ठाकरेंचे विचार माझ्या रक्तात - संजय राऊत
- गोगटे रंगमंदिर येथे पार पडली संजय राऊत यांची मुलाखत
"जर म्यानमारच्या रोहिंग्यासह पाकिस्तानी भारतात येऊ शकतात तर मी बेळगावमध्ये का जाऊ शकत नाही?" शनिवारी संजय राऊत हे कर्नाटक येथी कार्यक्रमासाठी आपल्या खासगी गाडीने आले होते. परंतू सध्या महाराष्ट्र कर्नाटक वादामुळे जर दुसऱ्या देशातील भारतात येऊ शकतात तर महाराष्ट्रातील व्यक्ती बेळगावला का जाऊ शकत नाही? हे चुकीचे असून तेथे वाद आहे हे मला माहिती आहे. मात्र, तुम्ही कुणाला येण्यासाठी मज्जाव करू शकत नाहीत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. बेळगावला येण्यास राऊत यांच्यावर जिल्हा प्रशासनाने विरोध केला आहे.
बेळगावमध्ये सांस्कृतिक व साहित्यिक अशा नियोजित कार्यक्रमाला मला बोलावले असल्याचे राऊत म्हणाले. कालच मंत्री यड्रावकरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.