मुंबई- मराठा समाजाच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आता हे आरक्षण कायदेशीर कसोटीवर सिद्ध झाले असून यात आता कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही आमची लढा द्यायची तयारी असल्याचे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
..तर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयातही लढा देण्याची तयारी - विनोद पाटील - छत्रपती शिवाजी महाराज
मराठा समाजाच्या संघर्षात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आता हे आरक्षण कायदेशीर कसोटीवर सिद्ध झाले असून यात आता कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही आमची लढा द्यायची तयारी असल्याचे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या चाळीस वर्षाच्या लढ्यात सर्वच राजकीय पक्षांनी सकारातमक भूमिका घेतल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. त्या पक्षांच्या नेत्यांना भेटून त्यांचे जाहीर आभार व्यक्त करत असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे . मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला, राज्यभर समाजाच्या वतीने जल्लोष व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे. ज्यांनी आमच्या लढ्यात मदत केली आहे, त्या सर्वांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे. शुक्रवारी आम्ही सर्व वकिलांचे आभार मानले, आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमुखाने कायदा पास केला त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार माणल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे.