महाराष्ट्र

maharashtra

किर्तीकर म्हणातात 'आरे ' जंगल नाही, मग आदित्य ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध का?- शर्मिला ठाकरे

By

Published : Sep 15, 2019, 3:07 PM IST

मला दमा आहे. त्यामुळे प्राणवायूची (ऑक्सिजन) गरज जाणते. मी पर्यावरण प्रेमी आहे. याबद्दल मला कोणी स्वार्थी बोला, की अप्पलपोटी बोला, पण आरे वाचलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे.

शर्मिला ठाकरे

मुंबई- शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी आरे हे जंगल नसल्याचे म्हटले आहे. मग आदित्य ठाकरे तेथील वृक्ष तोडीला का विरोध करत आहेत, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शर्मिला ठाकरे आझाद मैदानात 'आरे वाचवा' मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्या सोबत होते.

आरे वाचवा मोहिमेबाबत आपली प्रतिक्रिया देताना शर्मिला ठाकरे

मला दमा आहे. त्यामुळे प्राणवायू (ऑक्सिजन) ची मुल्य जाणते. मी पर्यावरण प्रेमी आहे. याबद्दल मला कोणी स्वार्थी बोला, की अप्पलपोटी बोला, पण आरे वाचलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

आरे येथे मेट्रो ३ चे कारशेड तयार होणार आहे. यासाठी २७०० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना आणि काही सामाजिक संस्था एकत्र आली व त्यांनी 'आरे वाचवा' ही मोहीम राबवली. यात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे दखील सहभागी झाले होते.

चूक आपल्या लोकांची आहे. आपण त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. यामुळे लोकांना ते गृहीत धरत आहेत. पालिका त्यांची आहे, सरकार त्यांचे आहे, मग लोकांना विचारणार कोण? आता लोकांनीच रस्त्यावर उतरले पाहिजे आणि जनतेची ताकद दाखवली पाहिजे. १० कोटी झाडे लावली ती मला दाखवावी. मी माझा विरोध मागे घेते, असे आवाहनच शर्मिला ठाकरे यांनी सरकारला केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details