मुंबई- पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेले उद्योगपती आणि शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना मंगळवारी किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी राज कुंद्रा यांच्या अटकेवर युक्तिवाद केला. यावेळी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. या मागणीला आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करत विरोध करण्यात आला आणि जामीन द्यावा अशी मागणी केली. मात्र याप्रकरणी अधिक चौकशी करायची असल्याने मुंबई पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी मान्य करत कोर्टानं राज कुंद्रा आणि त्यांचा साथीदार रयान थारप दोघांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टातील युक्तीवाद
राज कुंद्रा यांच्या वतीने जेष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमं जामीन मिळण्यासारखी आहेत, त्यामुळे कुंद्रा यांना कोठडी देऊ नये असा कुंद्रा यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. या गुन्ह्यात बरचसे परदेशी व्यवहार असल्याने याच्या तपासासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय आमचा तपास पूर्ण होणार नाही असं मुंबई पोलिसांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलं. गहना वशीष्ठ आणि वंदना तिवारी यांच्यासोबत कुंद्रा यांच्या कंपनीने जे कॉन्ट्रॅक्ट केले होते ते आम्हाला पडताळायचे आहेत. राज कुंद्रा या गुन्ह्यात मास्टरमाइंड आहे. त्यानेच हा गोरखधंदा सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवल्याचेही पोलिसांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.
सोमवारी रात्री कुंद्राला अटक
दरम्यान, तत्पूर्वी अश्लील चित्रफीत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) रात्री उशिरा चौकशीनंतर शिल्पा शेट्टी यांचे पती उद्योगपती राज कुंद्रा याला बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून आणखी एकाला अटक केली आहे. रयान थारप, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दोघांना आज (मंगळवार) कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल