मुंबई - संविधान आणि लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही रक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संविधानासह लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल - बाळासाहेब थोरात
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून आणि बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण दुर्देवाने आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज आहे, असे आमदार थोरात म्हणाले .
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आमदार थोरात म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी मोठा संघर्ष करून आणि बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रूजवली. त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले, देशाची प्रगती झाली. पण दुर्देवाने आज सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, आशिष दुआ, चेल्ला वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजन भोसले, यशवंत हाप्पे, नतिबोद्दीन खतीब, मदन भरगड, डॉ. गजानन देसाई, किशोर गजभिये, सचिव राजाराम देशमुख, अल नासेर झकेरिया, रामचंद्र दळवी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.