मुंबई- काँग्रेस हायकमांडने जबाबदारी दिली तर, नक्कीच मुख्यमंत्री होईल, असे संकेत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. मात्र, सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष काम करेल. या सरकारला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल, असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
'मी कोणतेही पद काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कधीही मागितले नाही' -
मुख्यमंत्री कोण होणार हे काँग्रेसचे हायकमांड ठरवेल. दिल्लीतील हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली, तर मी मुख्यमंत्री होईल, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासोबतच 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढवेल, असे संकेतही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्येतून दिले. मी कोणतेही पद काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कधीही मागितले नाही. विधानसभा अध्यक्ष पद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मी कधीही मागितले नव्हते. मात्र, या पदाची जबाबदारी काँग्रेस हायकामांडने माझ्यावर सोपवली आणि ती जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्याचे काम केले, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
'पाच वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री'