Decision Of Education Department : ‘कॉपी’ आढळली तर शाळेची मान्यता रद्द
दहावी, बारावी परिक्षे दरम्यान (Tenth, twelfth examination) कॉपीचे प्रकार वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॉपीला आळा घालण्यासाठी ज्या शाळांमध्ये कॉपी आढळेल त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात (If a 'copy' is found, the school is de-recognized) येईल, असा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधान परिषदेत आज माहिती दिली.
मुंबई: राज्यात पेपरपुटीचे प्रकार रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने उपाययोजना आखल्या आहेत. नुकताच विलेपार्ले येथे पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सातत्याने पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता कंबर कसली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात १ घंटा अगोदर पोहचावे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना सूट देण्यात येत होती. पण यापुढच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. राज्यात सुरक्षित पद्धतीने परीक्षा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे पडताळणी केल्याविना विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश करता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचारी वर्ग वाढवला आहे. पोलिस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी संख्या वाढवून दिल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी वर्गाकडूनही या परीक्षांसाठी जातीने लक्ष देण्यात येत, असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बोर्डाचे हेल्पलाईन क्रमांक जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.