मुंबई :उच्च न्यायालयात महिलेने दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी सुरु होती. ज्यामध्ये तिने केस पुण्याहून पनवेलला हलवण्यात यावी अशी विनंती केली होती. सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी पुण्याला जाणे गैरसोयीचे आहे. महिला आर्थिक उत्पन्नासाठी तिच्या पालकांवर अवलंबून आहे. त्यामुळे हस्तांतरणाची मागणी महिलेने केली आहे. तसेच पुण्यातील कोणत्याही वकिलाशी आपला परिचय नसल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे खटला पनवेलमधील न्यायालयात वर्ग करावा अशी विनंती महिलेने उच्च न्यायालयात केली आहे. उच्च न्यायालयाने महिलेची मागणी मान्य करीत महिलेला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असे निरिक्षण नोंदवले आहे.
पनवेलला जाणे गैरसोयीचे :पतीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अर्जदार काम करत असताना ती पुण्याला जात होती. तसेच तिने भारतातील विविध राज्यांमध्ये, मलेशियामध्येही प्रवास केला असल्याचा युक्तीवाद केला. पुण्यात आईची काळजी घ्यावी लागत असल्याने पनवेलला जाणे गैरसोयीचे असल्याचा युक्तीवाद पतीच्या वकिलांनी न्यायालयात केला. यावर पतीती मागणी न्यायालयाने फेटाळुन लावत पतीला दिलेल्या तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिली आहेत. तसेच न्यायालयात ठराविक कालावधित अर्ज करण्याची पतीची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.