महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील 'आयसीटी'ने तयार केला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेल - mumbai corona news

रेल्वे स्थानक, बस स्थानक, भाजीपाला बाजार, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून त्या भागातील नागरिकांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Sanitizer tunnel
Sanitizer tunnel

By

Published : Apr 8, 2020, 9:41 AM IST

मुंबई - देशातील विविध विद्यापीठे, संशोधन संस्थांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेलची निर्मिती केल्यानंतर आता मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला (आयसीटी) जाग आली आहे. या स्वायत्त संस्थेनेही अशा प्रकारच्या सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

रेल्वे स्थानक, बस स्थानक, भाजीपाला बाजार, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून त्या भागातील नागरिकांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जात आहे. ज्यामध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून हरियाणा येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आली आहे. या टनेलला फुमिगेशन टनेल असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येसुद्धा याचा उपयोग केला जात आहे.

'डब्ल्यूएचओ'च्या व्यवसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने या टनेलची निर्मिती केली आहे. यामध्ये पाण्यात १ टक्के सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेलमधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ४ ते ५ सेकंदाची वेळ लागते. ज्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी १२ फूट लांबीच्या पोर्टा केबीनचा वापर केला गेला आहे. नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्यांचे अधिक चांगले वितरण सुनिश्चित करण्यासाठी 'फ्लूड फ्लो सिस्टम अँनसिस'(ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन आणि सिम्युलेट केले गेले आहे. द्रवपदार्थ प्रमाणे दोन फ्लूड प्रणालीच्या पद्धतीचा वापर येथे केला आहे. डिस्क्रिट पार्टिक्युलेट मॉडेल (डीपीएम) चा उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ कसा सर्व ठिकाणी पोचला जाईल हे बघितले आहे. मानवी शरीरावर याचा प्रत्यक्षात काही विपरीत परिणाम होतो का नाही याचा शोध घेण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे. अशा प्रकारे कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जाणे शक्य होईल, पण ज्या लोकांना काही अ‌ॅलर्जी आहे, त्यांनी यामध्ये प्रवेश करणे योग्य राहणार नाही असे ही सामंत यांनी सांगितले.

या टनेल निर्मितीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले यांनी यासाठी संशोधन करून ह्या उपकरणाचे डिझाईन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details