मुंबई:उद्योग जगतातील अनेक कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी विविध समाज उपयोगी कामांसाठी दिला जातो. 'आयसीआयसीआय' या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून कर्करोग उपचार आणि संशोधनासाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील तीन महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे बाराशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे, अशी माहिती 'आयसीआयसीआय' बँकेच्या वतीने देण्यात आली.
कुठे? किती निधी? 'आयसीआयसीआय फाउंडेशन'तर्फे 'सीएसआर' निधीमधून सुमारे साडेसात लाख चौरस फुटांच्या क्षेत्रावर तीन नवीन इमारती बांधल्या जाणार आहे. टाटा मेमोरियलच्या केंद्रांवर अत्याधुनिक मशीनसह सुसज्ज यंत्रणा उभी करण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे. यापैकी नवी मुंबईत इमारत आणि साधनसामग्री उभी करण्यासाठी 407 कोटी रुपये, पंजाबमधील मुलंनपूर येथे सुसज्ज कर्करोग उपचार केंद्र उभारण्यासाठी 350 कोटी रुपये आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे असे केंद्र उभारण्यासाठी 390 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.
'एस आर फॉर्म' उपक्रम राबवणार:कोणत्याही संस्थेच्या 'टीएमसी'च्या सर्वांत मोठ्या योगदानासह 'आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्वेस्टीव्ह ग्रोथ' हे 'एस आर फॉर्म' उपक्रम राबवणार आहे. या तिन्ही केंद्रांची उभारणी आणि सुसज्ज निर्मिती 2017 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.