मुंबई :बहुचर्चित क्रिकेट विश्वचषकाच्या तारखेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयसीसीने आज विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानच्या या सामना कसा रंगणार याची उत्सुकता क्रीडा रसिकांना लागली आहे. आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे : यावर्षीचे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे या विश्वचषकाकडे जगभराचे लक्ष लागून आहे. विश्वचषकातील अनेक सामने मुंबईत होत आहेत. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या सामन्याकडेही क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे. यावर्षीची विश्वचषक भारतात होणार असल्याने जगभरातील क्रीडा रसिक भारतात येणार आहेत. त्यामुळे भारतात विश्वचषकाच्या सामन्यात चांगलीच रंगत येणार आहे.
भारतात खेळण्यास पाकिस्तानचा नकार :भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात खेळण्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB ) नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादामुळे हे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला आहे. त्यानंतर मात्र पाकिस्तानने भारतात विश्वचषकात खेळण्यास होकार दिल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निश्चित केले आहे.