मुंबई - मुंबईवरून कर्नाटककडे जाणाऱ्या इंडियन एअर फोर्सच्या एएन-३२ विमान मंगळवारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी मुंबईहून बंगळुरूकडे उड्ढाण घेत असताना अचानक धावपट्टीवरून खाली घसरले. विमानतळावरील २७ क्रमांकाच्या धावपट्टीवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. हे विमान कर्नाटकातील एअर फोर्सच्या येलहंका विमानतळाकडे निघाले होते.
मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे विमान धावपट्टीवरून घसरले - accident
सध्या एक धावपट्टी बंद असून विमान वाहतूक २० मिनिट विलंबाने सुरु आहे. एएन-३२ हे मोठे विमान असून मालवाहतुकीसाठी या विमानाचा उपयोग केला जातो.
मुंबई विमानतळाच्या ए-२७ नंबरच्या धावपट्टीवर हा अपघात घडला. सध्या ३२ नंबरच्या धावपट्टीचा उपयोग केला जात आहे. सध्या एक धावपट्टी बंद असून विमान वाहतूक २० मिनिट विलंबाने सुरू आहे. एएन-३२ हे मोठे विमान असून मालवाहतुकीसाठी या विमानाचा उपयोग केला जातो. यामुळे मुंबईवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. विमानतळावर मोठी रांग लागली होती. काही विमाने दुसऱ्या विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.
वायुदलाच्या एअरक्राफ्टचे किती नुकसान झाले आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मुंबई विमानतळावरील दुसरी धावपट्टी क्रमांक 09 व 14-32 इतर विमानांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वायुदलाचे हे एअरक्राफ्ट मुंबईहून उड्डाण भरून बंगलोर मधील येलंहका येथील वायुदलाच्या तळावर उतरणार होते. उड्डाणाच्या वेळेस या एअरक्राफ्ट मध्ये वायुदलाचे किती जवान होते याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही.