महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हिंगणघाट पीडितेला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु' - हिंगणघाट पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न

हिंगणघाटची घटना महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आहे. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. याप्रकरणी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

I will try to give justice to the victims of Hinganghat says balasaheb thorat
हिंगणघाट पीडितेला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

By

Published : Feb 10, 2020, 4:40 PM IST

Updated : Feb 10, 2020, 6:35 PM IST

मुंबई - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. याप्रकरणी सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

हिंगणघाटची घटना महाराष्ट्रासाठी अतिशय लाजीरवाणी आहे. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवले आहे. अशा घटना पुन्हा घडू नये, आरोपीला जरब बसावी यासाठी आणखी कठोर कायदा करण्याचेही राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे थोरात म्हणाले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

या तरुणीला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. तिला चांगल्या आरोग्य सुविधाही देण्यात आल्या होत्या. परंतू, तीला वाचवण्यात अपयश आले याचे दुःख आहे. पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन या कठीण प्रसंगी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबीयांच्या सोबत असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Last Updated : Feb 10, 2020, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details