महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vikas Kumbhare Fake Call : जे. पी. नड्डा यांना सर्व प्रकरणाची माहिती देणार : विकास कुंभारे - Vikas Kumbhare Fake Call

महाराष्ट्रात सध्या आमदारांच्या फगीचे प्रकरण चर्चेत आहे. मंत्री पदाच्या नावाखाली एका भामट्याने भाजपच्या तब्बल चार आमदारांना फोन करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचा बनाव करून या भाजपच्या आमदारांना संपर्क साधला होता. आमदारांनाच एका भामट्याकडून ठगवले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने सध्या महाराष्ट्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Vikas Kumbhare
विकास कुंभारे

By

Published : May 17, 2023, 4:42 PM IST

मुंबई : महाराष्ट्रात ज्या चार आमदारांना या भामट्यांनी फोन केला होता, त्यातील एक नाव म्हणजे नागपूरमध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास कुंभारे. या ठगांनी विकास कुंभारे यांना देखील फोन करून तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार आहे. फक्त गुजरातला एक कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात जो काही केटरिंगचा खर्च असेल तो तुम्ही करा, असे सांगण्यात आले होते. हे नेमकं प्रकरण काय आहे? नेमका घटनाक्रम कसा होता? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमदार विकास कुंभारे यांच्याशी संवाद साधला.


दुसरी व्यक्ती माझ्याशी बोलू लागली :ईटीव्हीशी बोलताना आमदार विकास कुंभारे यांनी सांगितले की, सर्वात पहिला फोन मला सात तारखेला आला समोरच्या व्यक्ती मला सांगत होता मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक बोलतोय. जे पी एक नड्डा यांना तुमच्याशी बोलायचं आहे. ते दुपारी तुम्हाला फोन करतील इतकंच बोलणं होऊन समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. दुपारी मला पुन्हा फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने सांगितलं जे पी नड्डा तुमच्याशी संवाद साधणार आहेत आणि दुसरी व्यक्ती माझ्याशी बोलू लागली. जेपी नड्डा म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने मला विचारलं, विकासजी कैसे हो आप आपका काम कैसा शुरू है. सध्या तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे. असे काही प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पक्षाची कोणतीही विशेष जबाबदारी नाही. मात्र, एक आमदार म्हणून माझ्यावर ज्या काही जबाबदारी आहेत त्या मी व्यवस्थित पार पाडतोय. माझं इतकच बोलणं झाल्यावर समोरच्या व्यक्तीने लगेच फोन कट केला.


देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत होतो :नंतर पुन्हा समोरच्या व्यक्तीने मला फोन केला आणि इतर चर्चा करू लागली. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. तुम्हाला मंत्रीपद दिले जाणार आहे. फक्त आमच्यासारख्या सामान्य माणसाला विसरू नका, असं जे पी नड्डा यांचा पीए म्हणून बोलणारे व्यक्ती मला सांगत होती. त्यावेळी मला संशय आला आणि मी संपूर्ण प्रकार हा नागपूरच्या पोलीस अधीक्षकांना सांगितला. त्यांनी मला विचारलं तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व प्रकार सांगितला आहे का ? त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत होतो. मात्र, ते बैठकांमध्ये व्यस्त होते, तोपर्यंत अधीक्षकांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. मग त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आणि या भामट्यांना ताब्यात घेतलं.



पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं :आम्ही वाट पाहत होतो की, हे लोक आमच्याकडे पैसे कधी मागतात. त्यांनी आमच्याकडे डायरेक्ट पैशाची मागणी केली नव्हती. त्यांनी गुजरातला एक पक्षाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जो काही केटरिंगचा खर्च होईल. तो मी करावा असं मला सांगितलं जात होतं. मी त्यांना सांगितलं मी नागपूरचा आमदार आहे. गुजरातच्या कार्यक्रमात किती खर्च येईल, हे मला कसं कळेलय पैसे किती हवे ते मला सांगा मी ते पैसे पाठवतो, असं म्हणून त्यांनी मला एक लाख 66 हजार रुपये मागितले आणि पेमेंट करण्यासाठी एक लिंक पाठवली. यानंतर मी त्यांना पोलिसांशी बोलणे झाल्याप्रमाणे टाळाटाळ करायला सुरुवात केली. मी बैठकांमध्ये आहे. कामात व्यस्त आहे, अशी उत्तर देऊ लागलो आणि ठरलेल्या सापळ्याप्रमाणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

ABOUT THE AUTHOR

...view details