मुंबई :राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी म्हणले आहेकी, मी केंद्र सरकारला लाऊडस्पीकरच्या वापराबाबत धोरण आणण्याची विनंती करतो. लाऊडस्पीकरच्या रांगेत शांतता राखण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य केल्याबद्दल मी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांचे आभार मानू इच्छितो
राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मशिदीवरील भोंग्यांवरुन वाद सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला मशिदीवरील भोंगे उतरावे असे अवाहन केले होते. तसेच हे भोंगे न उतरवल्यास मशिदी समोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. या मुळे राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य सरकारने वारंवार बैठका घेत दोन्ही समुदायाला शांततेचे आवाहन केले होेते.