महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मी तुमचा भाऊ, मला तुमच्या व्यथा सांगा'; कृषीमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद - दादा भुसे बातमी

राज्यात प्रथमच शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात दुवा म्हणून कृषी विभाग काम करणार आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांना आपले विचार, कैफीयत, कृषी विकासासाठीच्या उपाययोजना मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.

i-am-your-brother-tell-me-your-problem-says-dada-bhuse-in-mumbai
i-am-your-brother-tell-me-your-problem-says-dada-bhuse-in-mumbai

By

Published : Jan 17, 2020, 7:35 PM IST

Updated : Jan 17, 2020, 8:01 PM IST

मुंबई- शेतकऱ्यांच्या व्यथा मंत्रालयात एसीत बसलेल्या अधिकारी, मंत्र्यांना समजणार कशा? ही वर्षानुवर्षाची ओरड आहे. मात्र, प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी आमचे आयडॉल आहेत, असे कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. निसर्गावर अवलंबून असलेली शेती लहरी हवामानाच्या दुष्टचक्रातून सोडवून शेतकरी बांधवांना बाहेर काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषीमंत्री दादा भुसे

हेही वाचा-'साचेबद्ध शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड देण्याची आवश्यकता'

राज्यात प्रथमच शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात दुवा म्हणून कृषी विभाग काम करणार आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी यांना आपले विचार, कैफीयत, कृषी विकासासाठीच्या उपाययोजना मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. विशेष म्हणजे या उपक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद देत सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकरी प्रतिनीधींनी सहभाग घेतला.

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयंत पाटील, राज्य मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, कृषी तज्ज्ञ किशोर तिवारी, अजीत नवले, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे, कृषी संचालक यांच्यासह राज्यभरातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनीधी, प्रयोगशील व पुरस्कार प्राप्त शेतकरी उपस्थित होते.

गेल्या अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग झाला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना थेट कृषिमंत्री आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडता आल्या, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

तुमचा भाऊ म्हणून मला व्यथा सांगा, त्या समजून घ्यायला अधिकाऱ्यांसमवेत येथे आलोय, असे आवाहन करुन कृषीमंत्री म्हणाले की, लहरी हवामानामुळे शेतीवर संकट कायम येते. शेतकरी आत्महत्या या अतिशय वेदनादायी असून त्या रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया. कृषी विकासाच्या योजना राबविताना त्या सकारात्मक पद्धतीने राबवण्यात येतील. वर्षानुवर्ष शेती करणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांचे बोल ऐकण्यासाठी आम्ही आलोय त्यांच्या सूचना नक्कीच अमलात आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.


चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील शेतकऱ्यांनी समस्या मांडत शेतीसाठी विविध उपाययोजना सुचविल्या. प्रथमच झालेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनापर्यंत व्यथा पोहोचल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

Last Updated : Jan 17, 2020, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details