मुंबई : मुंबईकरांचे सर्व्हेक्षण (survey of Mumbaikars) :मुंबईत २५ लाख मुंबईकर हायपर टेन्शनचे रुग्ण (hyper tension patients in Mumbai) आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात हा आकडा मोठा असल्याने मुंबई डायबिटीस व हायपर टेन्शनमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम (Doctor Aplya Dari campaign) हाती घेतली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली १० हजार आशा वर्कर ३० वर्षांवरील ५० लाख मुंबईकरांची तपासणी करणार आहेत. सोमवारपासून (२ जानेवारी) ही मोहीम सुरु करण्यात येणार असून डायबिटीस व हायपर टेन्शनचे रुग्ण (Patients with diabetes and hypertension) आढळल्यास योग्य ते औषधोपचार केले जाणार आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोहीम (Special campaign in health centers) : या मोहिमेत गरोदर महिला व वयोवृद्धांची तपासणी करण्यात येणार आहे. ‘आशा’ वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्राथमिक तपासणी केली जाईल. यावर ‘बीएमएस’ डॉक्टरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल. तर सर्वेक्षणात आढळणार्या संशयितांवर डॉक्टर, पालिकेचे दवाखाने आणि आवश्यकता भासल्यास मोठ्या रुग्णालयांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात येणार आहे. या उपक्रमात आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे डॉ संजीवकुमार यांनी सांगितले.