मुंबई - पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीत घडली. एमा रोलांड मोन्टेरो (वय ३०) असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रोलांड विक्टर मोन्टेरो (वय ३३) याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा -नवी मुंबईत फार्मा कंपनीला भीषण आग; जीवितहानी टळली
माहेरच्यांकडून घर आणि दुचाकीसाठी पैसे आणण्यासाठी आरोपी पत्नीकडे तगादा लावत होता. विक्रोळी गाव येथे राहणाऱ्या एमा आणि रोलांड यांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, काही दिवसातच रोलांड एमाकडे पैशांची मागणी करू लागला. यासाठी तो तिला वारंवार मारहाणही करीत होता.
हेही वाचा -अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची बदली, एनआरएचएम घोटाळा भोवल्याची चर्चा
दोन दिवसांपूर्वीदेखील त्याने एमाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत तिच्या पोटातील पंथरी या भागाला जबर मार लागला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही होत होता. अखेर उपचारादरम्यान तिचा रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी एमाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रोलांडवर हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.