मुंबई- अनैतिक संबंधांच्या संशयातून दिनेश मोरे नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर नगर येथे ही घटना घडली.
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, आरोपीला अटक - husband killed his wife in mumbai
अनैतिक संबंधांच्या संशयातून दिनेश मोरे नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर नगर येथे ही घटना घडली.
आरोपी दिनेश मोरे हा त्याची पत्नी माया मोरे हिच्यावर परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा नेहमीच संशय घेत होता. यामुळे, दिनेश मोरे आणि त्याची पत्नी माया मोरे या दोघांमध्ये सतत भांडणे होत असे. बुधवारी पहाटेच्या सुमारास याच कारणामुळे दोघांच्यात वाद झाला. यानंतर रागाच्या भरात आरोपी दिनेश मोरे याने स्वयंपाक घरातील चाकू घेऊन माया हिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकूने तब्बल 6 वार केले.
चाकूने केलेल्या वारात माया मोरे ही जखमी झाली. काही वेळातच तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. यानंतर आरोपी दिनेश मोरे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिनेश मोरे हा सिक्युरिटी गार्डचे काम करीत होता तर त्याची मयत पत्नी ही घरकाम करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.