महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crime: सतत मोबाईल वापरल्यामुळे पतीकडून पत्नीवर कटरने वार - मुंबई

दहिसर परिसरामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत मोबाईवर टीव्ही मालिका पाहणे आणि जेवण देण्यास उशीर झाल्याने संतप्त झालेल्या आरोपी नवर्‍याने त्याच्या पत्नीच्या शरीरावर पेपर कटरने दहा वार केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमाराल घडली आहे.

File Photo
संग्रहीत

By

Published : Jun 25, 2022, 12:22 PM IST

मुंबई- दहिसर परिसरामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत मोबाईवर टीव्ही मालिका पाहणे आणि जेवण देण्यास उशीर झाल्याने संतप्त झालेल्या आरोपी नवर्‍याने त्याच्या पत्नीच्या शरीरावर पेपर कटरने दहा वार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे. जखमी महिलेला शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) भरती करण्यात आले असून तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. या प्रकरणात आरोपीला शुक्रवारी अटक (Arrested) करण्यात आली आहे. आरोपीला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर (Court appeared ) केले असता 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फिरोज मुजावर हा दहिसर पूर्वेतील न्यू एकता सोसायटीत राहणारा आहे. त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता, कारण ती तिच्या फोनवर बराच वेळ घालवत होती. तो राग डोक्यात धरून आरोपीने पत्नीवर वार केले आहे. पोलिसांनी बोरवली (Borwali) महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याला 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण -रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मुजावर घरी आले आणि त्यांनी जेवण वाढण्यास सांगितले. त्याची पत्नी कथितपणे तिच्या मोबाईलवर टेलिव्हिजन मालिका पाहत होती आणि तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. ज्यामुळे तो संतापला. त्यानंतर मुजावर याने ड्रॉवरमधून पेपर कटर उचलून पत्नीवर हल्ला केला आणि तिच्या हातावर चेहऱ्यावर आणि पाठीवर दहापेक्षा जास्त वार केले आहेत. हा संपूर्ण प्रकार त्यांची 19 वर्षांची मुलगी राहिजा हिच्यासमोर घडला आहे. तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली.



मी माझ्या पालकांना भांडताना ऐकले, पण ते नियमितपणे भांडत असल्याने मी लक्ष दिले नाही. पण माझी आई मदतीसाठी ओरडत असल्याचे ऐकून मी घाबरले, आणि काय झाले ते पाहण्यासाठी धाव घेतली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार आईचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. वडील हातात पेपर कटर धरलेले पाहून मोठा धक्का बसला. काय करावे हे कळत नव्हते. आणि 100 नबंरवर तरुणीने कॉल केला. फोन झाल्यानंतर काही क्षणात दहिसर पोलिस घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी आरोपीला अटक केली. त्यांच्या पत्नीला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सोफ्यावर रक्ताचे थैमान दिसले. किशोरी तिच्या आईच्या जखमा पुसत होती, तर आरोपी एका कोपऱ्यात बसला होता. 19 वर्षीय तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार की तिच्या आईला तिच्या मोबाईलवर टेलिव्हिजन मालिका पाहण्याचे व्यसन होते.

ABOUT THE AUTHOR

...view details