मुंबई- भाजपचा मुख्यमंत्री आम्हाला नको, त्यांचे राजकारण हे घातक आहे. आमदारांना दम देण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र पैसे घालतो, त्यातून गुजरातचे भले होणार आहे. समजुतीने सगळे घडत असते, केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांना हवे तर ते घेतीलच. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठका सुरू आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की, नाही यावर चर्चा होऊ शकते, पण भाजपचा मुख्यमंत्री नको, असे मत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावेत, असे दलवाई यांनी म्हटले. त्यांनी आज सामना कार्यालयात शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राजकारण सटासट होत नसते, टोपी घातली आणि काढली, इतके सोपे नसते, राष्ट्रपती राजवट नको आहे. भाजपकडे आमदारांची संख्या जास्त आहे तर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करावे.