मुंबई- देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, यंदा शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर कोरोनामुळे विरजन पडले आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना परदेशात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद केल्यामुळे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचे सरकारकडे मागणी
गेल्या वर्षीपासून देशासह संपूर्ण जगात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी घटली आहे. मात्र, यंदा आपल्या गुणवत्तेचा जोरावर परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर एक वेगळेच संकट उभे राहिले आहे. परदेशातील विविध विद्यापीठांत आपल्या गुणवत्तेवर प्रवेश मिळालेले लाखो विद्यार्थी वेळेत लस न मिळाल्यास प्रवेशाला मुकतील, अशी भीती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारांकडे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तत्काळ लसकीकरण करावे, अशी मागणी केले आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार
विद्यार्थांनी उल्का शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी यंदा ऑगस्टमध्ये परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे विद्यार्थी तेथे पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार ॲपमध्ये नोंद नसेल तर लसीकरण होणार नाही आणि लशीच्या दोन मात्रा ऑगस्टपूर्वी मिळाल्या नाहीत तर हे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकणार नाहीत. कारण परदेशातील शासनाने बाहेरून शिक्षणांसाठी येणाऱ्या विद्यार्थांना लसीकरण अनिवार्य केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले आहे त्याच विद्यार्थ्यांना देशात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या लाखो मुलांचे भवितव्य त्यांना वेळेत लस न मिळाल्यास अधांतरी राहण्याची भीती निर्माण झाली आहे.